एक्स्प्लोर
Agriculture Export : अन्नधान्याची निर्यात वाढली, आकडेवारी जाहीर
देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे.
Agriculture Growth India
1/9

सध्या देशात अन्नधान्याचा (Food) पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
2/9

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू (Wheat), तांदूळ (Rice), मका, भरड धान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळं अन्नधान्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
3/9

गहू, तांदळासह साखरेच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
4/9

देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
5/9

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात 40.26 टक्क्यांनी वाढून 3.33 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
6/9

बिगर बासमती तांदळाची निर्यातही 3.35 टक्क्यांनी वाढून 4.66 अब्ज डॉलर झाली आहे.
7/9

गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एप्रिल-डिसेंबर 2021 मधील 145.2 दशलक्षवरून गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 150.8 दशलक्ष डॉलर झाली आहे.
8/9

साखर उत्पादनाच्या बाबतीतही भारत जगातील मोठा देश आहे. भारतातून अनेक देशांना साखरेची निर्यात केली जाते. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनसार चालू विपणन वर्ष 2022-23 मध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखर निर्यात झाली आहे.
9/9

गहू आणि तांदळाच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे.
Published at : 11 Feb 2023 09:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
