मोठी बातमी! मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी
Yavatmal News : 28 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
Yavatmal News : यवतमाळ (Yavatmal) येथून मोठी बातमी समोर येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला आहे. यात 4 कामगार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भारी गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून,चार जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच एक अपघात घडला आहे. सभेसाठी डोम उभारले जात असतानाच त्याचे तीन पिल्लर खाली कोसळले आहेत. यावेळी तिथे काम करणारे काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
पंतप्रधान मोदी चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून सतत महाराष्ट्र राज्याचा दौरा करत असून, ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते आणि त्यांची त्यावेळी जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. पुढे 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतांना त्यांनी यवतमाळचा दौरा केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देखील मोदींनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला होता. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Yavatmal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; 'हे' आहे कारण