(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेत्यांवरील निष्ठा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर, उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र तर शिंदे गटांकडून समर्थन पत्र
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राज्यात सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राज्यात सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही गटा कडून आपापल्या समर्थकांचे मेळावे बैठका घेतले जात असून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. याच दरम्यान जर पाहिले शिवसेनेच्या बंडाळी नंतर शिवसेनेने सावध पवित्रा घेत राज्यभरातील शिवसैनिकाकडून याआधी 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपर वर प्रतिज्ञापत्र भरून मागवले. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा अश्याच पध्दतीने साध्या कागदावर समर्थन पत्र लिहून घेतले जात आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत सध्या दोन गट निर्माण झालेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच दोन्ही पक्षांकडून आता कार्यकर्ते आणि समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात असल्याचं समोर आलंय. यवतमाळमध्ये बंडखोर संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समर्थकांकडून अशाप्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येतंय. दुसरीकडे जळगावात शिवसैनिकांकडूनही अशाप्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातंय. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचे 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून घेण्यात येतंय. वरिष्ठ पातळीवरुन आदेश आल्याने ही मोहीम राबण्यात येतेय असं सांगण्यात आलंय..
यवतमाळमध्ये शिंदे समर्थकांची बैठक -
शिंदे गटात गेलेल्या आमदार संजय राठोड यांच्या यवतमाळमधील जनसंपर्क कार्यलयात शिंदे समर्थकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे नेते ठाण्यातील नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आणि समर्थन पत्र भरून घेतले का? याबाबत संजय राठोड गटातील समर्थक गजानन बेजांकिवार यांनी कुठलेही समर्थन पत्र भरून घेतले जात नाही आहे असे उत्तर दिले.
याबैठकीनंतर आलेल्या शिवसैनिकाशी आम्ही संवाद साधला असता, हो आम्ही या बैठकीला एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांना समर्थन द्याला आलो आणि इथं समर्थन पत्र भरून दिले, असे शिवसैनिकने सांगितले. शिवसेना आणि शिंदे गट सेना हे दोघेही ह्या समर्थन पत्राद्वारे आपली कायदेशीर बाजू भक्कम कशी? हे दाखविणार असून राज्यभर असे पत्र दोन्ही गटा कडून भरून घेतले जात आहे. त्यामुळे आगामी काळात हे समर्थन आणि पाठींबा पत्रचे युद्ध काय रंग घेते हे पाहणे महत्वाचे आहे.