(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine Crisis : तर तिसरे महायुद्ध होणार.., झेलन्सकी यांचा इशारा
झेलन्सकी यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार आहे. पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते, असे झेलन्सकी म्हणाले आहेत.
Russia Ukraine Crisis : तब्बल तीन आठवड्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. हे युद्ध रोखण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र, रशियाच्या भूमिकेमुळे युद्धाला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्सकी यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार आहे. पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते, असे झेलन्सकी म्हणाले आहेत. "पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही संधीचा वापर करावा लागेल. परंतु जर हे प्रयत्न अयशस्वी झाले तर याचा अर्थ असा होईल की हे तिसरे महायुद्ध आहे," असंही युक्रेनियन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
#RussiaUkraineCrisis | Zelensky: 'I'm ready for negotiations with Putin, but if they fail, it could mean World War III': The Kyiv Independent
— ANI (@ANI) March 20, 2022
वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले होते की, रशियाने बंदरगाह शहर मारियुपोलवर केलेला हल्ल्याची इतिहासात नोंद होईल, कारण रशियाने युद्धाचे नियम मोडले आहेत. राष्ट्राला संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले होते की, ‘‘ शांततापूर्ण शहरवर आक्रमण करणाऱ्याने युद्ध नियमांचे उल्लंघन केले आहे. हा एकप्रकारे दहशतवाद आहे, जो येणाऱ्या शतकानुशतके स्मरणात राहील. ’’ रशियाचे सैनिक युक्रेनमध्ये घुसले असून सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करत आहेत. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. दरम्यान, रशियामध्ये पुतीन यांना राष्ट्रध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे वृत्त युक्रेनमधील प्रसारमाध्यमांनी लष्कराच्या गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाबाबत शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
- Russia Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू
- Russia-Ukraine War : देशासाठी आधी हातात रॅकेट घेतलं, बलाढ्य फेडररला हरवलं, आता रशियाला हरवण्यासाठी रायफल हाती!
- व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला!
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live