एक्स्प्लोर

Neal Mohan : भारतीय वंशाचे नील मोहन YouTube चे नवे सीईओ, सुसान व्होजिकी यांचा राजीनामा

भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube)  नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) म्हणून नियुक्ती झाली आहे.

Neal Mohan : भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube)  नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान व्होजिकी (Susan Wojcicki) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. यूट्यूब हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc) ने गुरुवारी (16  फेब्रुवारी) याबाबतची घोषणा केली.

वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुसान व्होजिकी यांचा राजीनामा

दरम्यान, आपले कुटूंब, आरोग्य व काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूट्यूब कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुसान व्होजिकी यांनी दिली आहे. त्यांनी YouTube च्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. यूट्यूब जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटच्या भूमिकेतही असणार आहेत.

2015 मध्ये नील मोहन यूट्यूबमध्ये झाले होते रुजू 

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नोव्हेंबर 2015 मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुसान यांनी एक खूपच चांगली टीम बनवली आहे. नीलच्या रुपात त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. ते येणाऱ्या दशकात यूट्यूबचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. 

नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी 15 वर्षे केलं एकत्र काम

YouTube चे CEO होण्यापूर्वी नील मोहन यांनी कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वी, मोहन यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये देखील काम केलं आहे. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी जवळपास 15 वर्षे एकत्र काम केले आहे. नील मोहन आता अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत काम करतील. सुंदर पिचाई हे देखील भारयी वंशाचे आहेत. नील मोहन यांच्या पत्नी हेमा सरीम मोहन या देखील भारतीय वंशाच्या आहेत. याचबरोबर  मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Rishi Sunak New UK PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, कोण आहेत ऋषी सुनक? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरीPankaja Munde Speech beed | तुतारीकडून पराभव..सगळं विसरा; माफ करणारा राजा, पंकजा मुंडेंचा भाषणUddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषणCM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Embed widget