एक्स्प्लोर
विल यू मॅरी मी? जॉन सीनाने रिंगमध्ये गर्लफ्रेण्डला प्रपोज केलं!
फ्लोरिडा : WWE सुपरस्टार जॉन सीनाने रेसलमेनिया 33 दरम्यान रिंगमध्येच गर्लफ्रेण्ड निकी बेलाला प्रपोज करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सामना संपल्यानंतर जॉन सीनाने निकीला रिंगमध्ये प्रपोज करुन अंगठी घातली.
पहिल्यांदा सामना जिंकला, मग प्रपोज केलं
रेसलमेनिया 33 दरम्यान रविवारी जॉन सीना आणि निकी बेलाचा सामना मिज आणि मरीस यांच्यासोबत होता. परंतु जॉन आणि निकीच्या जोडीने केवळ 5 मिनिटात दोघांना धोबीपछाड देत सामना जिंकला. पण खरा ट्विस्ट तर सामना संपल्यानंतर आला.
...आणि लग्न ठरलं!
सामना संपल्यानंतर जॉन सीनाने रिंगमध्येच निकीला प्रपोज केलं. या दरम्यान जॉन सीनाची आईदेखील तिथे उपस्थित होती. जॉन आणि निकी अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव मिळणार आहे. मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
जॉन आणि निक्की मोठ्या सुट्टीवर
या सामन्यानंतर जॉन सीना आणि निकी बेला यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याची घोषणा केली. त्यामुळे काही दिवस तरी हे दोघे कोणत्याही सामन्यात दिसणार नाहीत.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/WWE/status/848710332780470272
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement