एक्स्प्लोर
Advertisement
प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप
मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र ती सध्या खूप आजारी आहे, शिवाय डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत, असा आरोप इमानची बहिण शायमा सेलिमने केला आहे.
मुंबईतील सैफी रुग्णालयात इमान अहमद वजन कमी करण्यासाठी उपचार घेत आहे. डॉ. मुझफ्फल लकडावाला यांच्याकडे ती उपचार घेत आहे. डॉक्टरांनी तिची व्यवस्थित काळजी घेण्याचं होतं आणि वजन कमी होईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र सध्या इमानचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. डॉक्टर आमच्याशी खोटं बोलले, असा आरोप इमानच्या बहिणीने केला आहे.
इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचं वजनही करुन घेतलं नाही. आणि केलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान शायमा यांनी 'माय मेडिकल मंत्र' या वेबसाईटशी बोलताना दिलं.
दरम्यान डॉ. लकडावाला यांनी इमानच्या बहिणीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इमानवर उपचार करुन तिला पुन्हा तिच्या घरी पाठवण्याचं नियोजन करत असल्याने शायमाने आरोप केले आहेत, असं लकडावाला यांनी 'माय मेडिकल मंत्र' या वेबसाईटशी बोलताना सांगितलं.
उपचारासाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
संबंधित बातम्या :
इमान अहमदचं वजन कोणत्याही सर्जरीविना 100 किलो घटलं
इमान अहमदचं तब्बल 262 किलो वजन घटलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement