एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचा मृत्यू
वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं.
अबु धाबी : कोणे एके काळी जगातील सर्वात लठ्ठ असलेल्या इमान अहमद या महिलेचा मृत्यू झाला आहे. 'खलीज टाइम्स' या वृत्तपत्राच्या माहितीनुसार अबुधाबीतील बु्र्जिल रुग्णालयात वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान तिचं निधन झालं.
इजिप्तची रहिवासी असलेली 36 वर्षीय इमान जगातील सर्वात लठ्ठ महिला ठरली होती. काही महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर सैफी रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 500 किलोंवरुन 238 किलोंपर्यंत कमी झाल्याची माहिती होती. वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती.
जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर मुंबईनंतर अबुधाबीत उपचार!
स्थानिक वेळेनुसार सोमवार 25 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं. जवळपास 20 डॉक्टरांची टीम तिच्यावर देखरेख ठेवून होती. सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला इमानवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली होती. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली होती. सैफी रुग्णालयात इमानची प्रकृती खालावल्याचा दावा तिची बहीण सायमानं केला होता. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि सायमामध्ये वाद झाले. अखेर इमानला अबुधाबीला हलवण्याचा निर्णय झाला, मात्र जाण्यापूर्वी सायमाने आपला गैरसमज झाल्याची कबुलीही दिली. संंबंधित बातम्या:अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement