(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Pig Kidney Transplant : अनुवांशिकरित्या संशोधन करुन शरीरामध्ये डुकराची किडनी (First Pig Kidney Transplant)बसवलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Pig Kidney Transplant : अनुवांशिकरित्या संशोधन करुन शरीरामध्ये डुकराची किडनी (First Pig Kidney Transplant)बसवलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यापूर्वी त्या व्यक्तीचं ऑपरेशन करत डुकराची किडनी बसवण्यात आली होती. डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा अमेरिकेतील पहिला व्यक्ती ठरला होता. त्याचं नाव इतिहासात नोंदवण्यात आलं होतं. पण दोन महिन्यानंतरच त्याचं निधन झाल आहे. त्या व्यक्ताचं नाव रिचर्ड रिक स्लेमन आहे. शनिवारी, 11 मे 2024 रोजी रुग्णालय आणि रिचर्ड रिक स्लेमन याच्या कुटुंबांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मार्च 2024 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन डुक्कराची किडनी प्रत्यारोपीत करण्यात आली होती.
62 वर्षीय रिचर्ड रिक स्लेमन याच्यावर दोन महिन्यापूर्वी मॅसाचुसेट्स रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. त्यावेळी सर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डुक्काराची किनडी कमीत कमी दोन वर्षांपर्यंत चालेल. दरम्यान, शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयानं सांगितलं की, डुक्कराच्या किडनीचं प्रत्यारोपण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. मॅसाचुसेट्स रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट करणाऱ्या सर्जन/डॉक्टरांच्या याबाबत दु:ख व्यक्त केलं. रिचर्ड रिक स्लेमन याच्या कुटुंबाप्रति संवेदनाही व्यक्त केली. डुकराची किडनी ट्रान्सप्लाँट केल्यानंतर जिवंत राहिलेला रिचर्ड रिक स्लेमन पहिला व्यक्ती होता. याआधी दोन वेळा असा प्रयोग केला होता, पण त्या दोन्ही वेळी व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
Mass General is deeply saddened at the sudden passing of Mr. Rick Slayman. We have no indication that it was the result of his recent transplant. Mr. Slayman will forever be seen as a beacon of hope to countless transplant patients worldwide and we are deeply grateful for his… pic.twitter.com/I1dFqHZEmr
— MassGeneral News (@MassGeneralNews) May 11, 2024
मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
याआधी ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीमध्ये डुकराची किडनी तात्पुरती ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. डुक्करांचे हृदय प्रत्यारोपणही दोन व्यक्तींमध्ये करण्यात आले. मात्र, काही महिन्यांनी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पण रिचर्ड रिक स्लेमन हा दोन महिन्यापर्यंत जिवंत राहिला. शनिवारी त्याचं निधन झालं. दरम्यान, रिचर्ड स्लेमन यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याबाबत अद्याप निदान झाले नाही. मात्र, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयाने सांगितलं की, स्लेमन यांच्या मृत्यूचे कारण किडनी प्रत्यारोपणाशी संबंधित नव्हते, असे वृत्त एबीसी न्यूजने वृत्त दिले आहे. 2018 मध्ये किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर स्लेमन यांच्यात मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. गेल्या वर्षी स्लेमन यांना पुन्हा किडनीचा त्रास सुरू झाल होता. तेव्हा डॉक्टरांनी स्लेमन यांनी डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे त्यांच्या डॉक्टरांनी सुचवले होते. त्यानंतर मार्च 2024 मध्ये त्यांना डुकराची किडनी बसवण्यात आली. पण दोन महिन्यातच त्यांचं निधन झालं.