एक्स्प्लोर

जगभरात कोरोनाचा कहर, एका दिवसात 12 हजार रुग्णांचा मृत्यू, 24 तासात 6 लाख नवे रुग्ण

World Coronavirus Update: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटी 7 लाखांवर पोहचली आहे. आतापर्यंत जगात एकूण 14 लाख 25 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

World Coronavirus Update: जगातल्या 218 देशांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या संख्येत 6 लाखांची वाढ झालीय. तसेच 12 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्या आधी एका दिवसात 11,733 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. त्यानंतर मेक्सिको, इटली, पोलंड, ब्राझील, भारत, रशिया, इराण या देशांचा क्रमांक लागतोय.

एकूण 14 लाख लोकांचा मृत्यू वर्ल्डोमीटर वेबसाइटच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत 6.07 कोटी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच कोरोनामुळे एकूण 14 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत एकूण 4 कोटी 19 लाख रुग्ण बरे झाले आहेत. अजूनही उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 73 लाख इतकी आहे.

कोरोना बाधित टॉप 10 देश कोरोनाच्या प्रभावाच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक अमेरिकेचा लागतो. अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1 लाख 78 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 92 लाख इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनाच्या संख्येबाबत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 45 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

अमेरिका: रुग्णसंख्या- 13,135,658, मृत्यू- 268,198 भारत: रुग्णसंख्या- 9,266,697, मृत्यू- 135,261 ब्राझील: रुग्णसंख्या- 6,166,898, मृत्यू- 170,799 फ्रान्स: रुग्णसंख्या- 2,170,097, मृत्यू- 50,618 रशिया: रुग्णसंख्या- 2,162,503, मृत्यू- 37,538 स्पेन: रुग्णसंख्या- 1,622,632, मृत्यू- 44,037 यूके: रुग्णसंख्या- 1,557,007, मृत्यू- 56,533 इटली: रुग्णसंख्या- 1,480,874, मृत्यू- 52,028 अर्जेंटिना: रुग्णसंख्या- 1,390,388, मृत्यू- 37,714 कोलंबिया: रुग्णसंख्या- 1,270,991, मृत्यू- 35,860

गेल्या 24 तासात जगातील 14 देशांत 20 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 9 देश असे आहेत ज्यात आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या संख्येपैकी 56 टक्के लोक हे केवळ अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको, ब्रिटन आणि इटली या सहा देशांतील आहेत. तसेच जगातील 22 देशांतील कोरोनाची रुग्ण संख्या ही 5 लाखांवर गेली आहे. त्यात इटली, पेरू, दक्षिण आफ्रिका, इराण, जर्मनी, पोलंड आणि चिली या देशांचा समावेश आहे.

भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याबाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. जगात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अमेरिका, फ्रांस, इटली, बेल्जियम, ब्राझील आणि रशिया या देशांत आहे

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget