World Autism Awareness Day 2023 : मुलांमध्ये आढळणारा 'ऑटिझम' म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
World Autism Awareness Day 2023 : जगभरात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो.
World Autism Awareness Day 2023 : जागतिक ऑटिझम जागरूकता दिन 'World Autism Awareness Day' दरवर्षी 2 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभरात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहित करणं हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे.
ऑटिझम हा मुलांमध्ये होणारा मानसिक विकार आहे. या आजाराविषयी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने, संयुक्त राष्ट्र महासभेने 2007 साली 2 एप्रिल हा दिवस 'जागतिक ऑटिझम जागरूकता दिन' म्हणून घोषित केला. जगभरातील मुलांमध्ये होणारा हा मानसिक विकार रोखण्यासाठी, त्यांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली जातात. 'World Autism Awareness Day'चा उद्देश ऑटिझम असलेल्या लोकांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर प्रकाश टाकणे हा आहे.
ऑटिझम म्हणजे काय?
ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ऑटिस्टिक मुलांमध्ये साधारणपणे दीड ते अडीच वर्ष या काळात सौम्य लक्षणं दिसायला सुरुवात होते. ऑटिझममध्ये मुलांना समाजामध्ये मिसळायला, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधायला त्रास होतो. यामध्ये वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात. यामध्ये काही मुलं अतिशय कुशाग्र, हुशार तर काही मनाने कमकुवत असतात. काहींना शिकण्यात आणि समजण्यात अडचण येते, तर काहींना वर्तणुकीशी संबंधित समस्या असतात. अशा मुलांची काळजी घेत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ऑटिझममुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्णपणे थांबतो.
ऑटिझमची लक्षणे कोणती?
ऑटिझमची लक्षणे बाळाच्या जन्मानंतर तीन वर्षांच्या आत दिसू लागतात. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे...
- मुलं आई-वडिलांशी संपर्क साधत नाहीत. त्यांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. तसेच, ते डोळ्यांशी संपर्क साधण्यासही टाळतात.
- ऑटिस्टिक मुलं एकांतात राहणं पसंत करतात.
- आवाज ऐकूनही प्रतिसाद देत नाही.
- ऑटिझम मुलांमध्ये भाषेशी संबंधित समस्याही दिसून येतात.
- ही मुलं स्वतःमध्ये हरवून जातात.
- जर मुलाने बोलण्याऐवजी विचित्र आवाज काढला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
ऑटिझमचा उपचार :
ऑटिझमवर अजून कोणताही अचूक उपचार उपलब्ध नाही. मुलाची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. थेरपी, बिहेव्हियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी इत्यादी थेरपी त्यांच्या उपचारात केली जाते. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :