एक्स्प्लोर
उत्तर-दक्षिण कोरियाच्या वादात चीन, रशिया आणि जपानला एवढा रस का?
अमेरिकेने युद्धाच्या काळात दक्षिण कोरियाला साथ दिली होती. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला अमेरिकेचा तिरस्कार आहे.
मुंबई : जगभरासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाला अमेरिकेने चांगलाच धडा शिकवला. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या हद्दीत लढाऊ विमानाने मॉक ड्रिल केलं. अमेरिकेने दिलेला हा मोठा इशारा मानला जात आहे. उत्तर कोरियाकडून सतत मिसाईल चाचणी केली जात आहे, ज्यावर अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया नाराज आहे.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचा वाद नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्दा असतो. या वादात रशिया, चीन आणि जपानची भूमिका नेहमीच दिसून येते. मात्र या वादात चीन, रशिया आणि जपानला एवढा रस का असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी इतिहासात जाण्याची गरज आहे.
1910 ते 1945 या काळात उत्तर आणि दक्षिण कोरिया हा एकच देश होता. या देशावर जपानचा ताबा होता. 1945 मध्ये जेव्हा दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला तेव्हा सोव्हिएत रशियाने कोरियाच्या उत्तर आणि अमेरिकेने दक्षिण भागावर वर्चस्व मिळवलं. 1945 ते 1948 सालापर्यंत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्याकडे असलेल्या ताब्यावरुन विरोध सुरु झाला. त्यानंतर अखेर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशा दोन वेगवेगळ्या देशांची स्थापना करण्यात आली. उत्तर कोरियात रशिया आणि चीन पुरस्कृत सरकारची स्थापना झाली, तर दक्षिण कोरियात अमेरिका पुरस्कृत सरकारची स्थापना करण्यात आली.
1950 साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला आणि मोठ्या भागावर ताबा मिळवला. दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी अमेरिकेने सैन्य पाठवलं आणि उत्तर कोरियाला पळवून लावलं. तर चीनने या युद्धात उत्तर कोरियाची साथ दिली. चीनने उत्तर कोरियाच्या मदतीसाठी एक लाखांपेक्षा अधिक चिनी सैनिक पाठवले होते.
चीन-उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्या सैन्यातील संघर्ष अनेक दिवस चालूच राहिला. अखेर भारताने मध्यस्थी करत इंग्लंडच्या मदतीने चीनला युद्धविराम घेण्यासाठी तयार केलं. 1953 साली उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील युद्ध थांबलं. हे युद्ध थांबवण्यामागे भारताची महत्त्वाची भूमिका होती. युद्धबंदीसाठी भारतीय सैन्याने मदत तर केलीच, शिवाय भारतीय सैन्याचं लष्करी रुग्णालयही पाठवण्यात आलं होतं.
अमेरिकेने युद्धाच्या काळात दक्षिण कोरियाला साथ दिली होती. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला अमेरिकेचा तिरस्कार आहे.
संबंधित बातम्या :
जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!
उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची चाचणी
युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध
अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement