एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'चाळीस चोरां'च्या कथेतील 'अलीबाबा'चं नावं चीनमधील बलाढ्या कंपनीने का ठेवलं?
'अलीबाबा' हा शब्द हिंदी आणि उर्दू भाषेत वापरला जातो. बहुतांश हिंदी भाषेतच. मात्र तो मूळ हिंदीतला शब्द नसून, अरबी भाषेतून हिंदी भाषेत आला आहे. आपल्या सगळ्यांना 'अलीबाबा आणि चाळीस चोर' या कथेमुळे हा शब्द अधिक परिचित आहे.
मुंबई : प्रत्येक कंपनी आपल्या कंपनीचं नाव काहीतरी हटके ठेवण्याच्याच प्रयत्नात असते. कंपनीच्या नावात क्रिएटिव्हिटी असावी, असाच अनेकांचा प्रयत्न असतो. एका शब्दात आपल्या कंपनीचं क्षेत्र, काम, गुण, उद्देश वगैरे वगैरे स्पष्ट व्हावा, अशीच अनेकांची इच्छा असते. मात्र चीनमधील 'अलीबाबा' कंपनीने लोकप्रिय 'अलीबाबा आणि चाळीस चोर' कथेतील 'अलीबाबा'चं ना रा ठेवलं आहे. असे नाव का ठेवावं वाटलं, याची एक रंजक कथा आहे.
'अलीबाबा' हा शब्द हिंदी आणि उर्दू भाषेत वापरला जातो. बहुतांश हिंदी भाषेतच. मात्र तो मूळ हिंदीतला शब्द नसून, अरबी भाषेतून हिंदी भाषेत आला आहे. आपल्या सगळ्यांना 'अलीबाबा आणि चाळीस चोर' या कथेमुळे हा शब्द अधिक परिचित आहे.
चीनमधील 'अलीबाबा' कंपनीला सुद्धा हे नाव याच कथेतून घ्यावं वाटलं. अर्थात, त्यामागची कथा नक्कीच इंटरेस्टिंग अशी आहे. कंपनीच्या या नावामागे नक्की काय कथा आहे, हे दस्तुरखुद्द 'अलीबाबा'चे संस्थापक जॅक मा यांनी 2006 साली सांगितले होते.
जॅक मा हे त्यांच्या कंपनीसाठी सर्वांना आवडेल किंवा सर्वांना लगेच रिलेट होईल, असे नाव शोधत होते. जॅक मा यांना वाटत असे की, त्यांच्या कंपनीचं नाव जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसाला कंपनीचं नाव कळावं.
एकदा जॅक मा हे सॅनफ्रान्सिस्कोमधील कॉफी शॉपमध्ये बसले होते. तेव्हा त्यांनी तेथील एका वेट्रेसला विचारले, "तू कधी अलीबाबा शब्द ऐकलायेस का? किंवा हा शब्द उच्चारल्यानंतर तुझ्या मनात पहिले काय येते?" वेट्रेसने सांगितले, "ओपन सेसमी (खुल जा सिम-सिम)". त्यानंतर जॅक मा यांनी हाच प्रश्न आजूबाजूला असलेल्या जवळपास तीस लोकांना विचारला. जवळपास सगळ्याच जणांना अलीबाबा शब्द माहित होता. त्यावेळी जॅक मा यांनी 'अलीबाबा' शब्द कंपनीशी अंतिम केला.
अलीबाबा या पात्राबद्दल जॅक मा सांगतात, "अलीबा एक उदार, चाणाक्ष आणि लोकांसाठी चांगल्या हेतून काम करणारा व्यापारी होता. त्यामुळे आपल्या कंपनीचा उद्देशही असाच काहीसा आहे."
चीनमध्ये 'अलीबाबा' शब्दाचा उच्चार 'अ-ली-बा-बा' असा तुटक तुटकपणे केला जातो. मात्र जगभरातल्या लोकांना माहित असलेल्या कथेतील अलीबाबाला थेट कंपनीच्या नावात बसवून जॅक मा यांनी आपली कंपनीही जगप्रसिद्ध केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement