(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यावर नेमकं काय होतं? हा खरंच गुन्हा आहे का? खा. तेजस्वी सूर्या प्रकरणानंतर सुरु झाल्या चर्चा
Emergency Door: विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांना छोटे प्रशिक्षण दिले जाते. विमानाचे दरवाजे हे वैमानिक किंवा क्रू मेंबरच्या आदेशानंतरच उघडण्यत येतात.
नवी दिल्ली: भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपात्कालीन दरवाजा (Emergency Exit) उघडला. त्यानंतर विमानातील इमर्जन्सी दरवाजाचा प्रश्न ऐरणीवर आला. विमानाील इमर्जन्सी दरवाजा नेमका कुठे असतो? तो उघडला तर गुन्हा दाखल होतो का? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत...
Emergency Exit म्हणजे आपत्कालीन दरवाजे प्रवाशांना आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी देण्यात आले आहेत. जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती येते त्यावेळीच दरवाजे उघडण्यात येतात. विशिष्ट पद्धतीनेच दरवाजे उघडण्यात येतात. यासाठी विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांना छोटे प्रशिक्षण दिले जाते. विमानाचे दरवाजे हे वैमानिक किंवा क्रू मेंबरच्या आदेशानंतरच उघडण्यात येतात.
तज्ज्ञांच्या मते आपत्कालीन दरवाजे हे विमान प्रवासादरम्यान उघडले जात नाहीत. कारण विमानात असलेल्या एअर प्रेशरमुळे दरवाजे उघडण्यास अडचण येते. काही वर्षांपूर्वी प्रवाशांना कायमच याबद्दल उत्सुकता होती. तेव्हा प्रवाशांनी विमान जमिनीवर असताना प्रयोग केले होते.
विमानात Emergency Door नेमके असतात कुठे?
commercial विमानाचे Emergency Door हे विमानाच्या विंगच्या वरच्या बाजूला असतात. इमर्जन्सी दरवाजे हे मुख्य दरवाजांपासून वेगळे असणे गरजेचे असते. प्रवाशांसाठी वापरण्यात येणारे दरवाजे हे विमानाच्या पुढच्या आणि मागील भागात असतात.
या अगोदर देखील घडला होता प्रकार?
दरम्यान 10 फेब्रुवारी 2017 साली मुंबईहून चंदीगढला जाणाऱ्या विमानाचे दरवाजे टेक ऑफ करण्यापूर्वी उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला होता. त्याला इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्यामुळे 336 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्यावर्षी देखील जुलै महिन्यात एअर एशियाच्या I5-546 विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला होता. रांची विमानतळावर विमान लॅन्ड होण्यापूर्वी त्याने हा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर प्रवाशाला स्थानिक पोलिसांनी अटक देखील केली होती.
Tejasvi Surya: काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी DGCA ने आपल्या एका निवेदनात म्हटलं होतं की 10 डिसेंबर रोजीच्या इंडिगो विमान 6E-7339 मध्ये एका प्रवाशांने इमर्जन्सी गेट उघडलं होतं. या प्रकरणाचा आदेश देण्यात आला आहे. DGCAच्या या निवेदनानंतर इमर्जन्सी गेट उघडणारा तो प्रवासी म्हणजे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या असल्याचं स्पष्ट झालं. तेजस्वी सूर्या यांचे नाव या प्रकरणात उघड झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्ष काँग्रेस, एमआयएम आणि टीएमसी यांनी टीका केली होती. भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) यांनी माफी मागितल्याचं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी स्पष्ट केलं आहे