एक्स्प्लोर

पाण्यावरुन भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढणार?

भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये पाणी प्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीवर सध्या जलसंकट ओढवले आहे. कराची आणि आपसपासच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे. या परिसरातील लोकांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान भारतानेदेखील पाण्याबाबत देशांतर्गत एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणानुसार भारतातील 70 टक्के लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्या देशात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत उभय देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरुन मोठा वाद होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला आहे. या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. यावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. या जलविद्युत प्रकल्पाचा दाखला देत भारताकडून सिंधू जल कराराचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त केली जात आहे. चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प आणि पाकिस्तानमधील पाणीटंचाई या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पथक नेमले आहे. हे पथक चिनाब नदीजवळ प्रकल्पाची पाहणीदेखील करणार आहे. दुसऱ्या बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget