एक्स्प्लोर
लग्नात नवरदेवच रिपोर्टर, विवाहाचं लाईव्ह टेलिकास्ट
सिटी 41 या पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी हातात बूम (माईक) घेऊन फिरत आहे
इस्लामाबाद : लग्नाचा दिवस नवरदेव आणि नवरीसाठी खास असतो. त्या दिवशी सगळी हौसमौज करुन घेणं, पाहुण्यांमध्ये मिरवणं, ढीगभर फोटो काढणं, यावर त्यांचा भर असतो. मात्र पाकिस्तानातल्या एका पत्रकाराची हौस भलतीच. त्याने चक्क स्वतःच्याच लग्नात रिपोर्टिंग केलं.
सिटी 41 या पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार आहे. स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी तो हातात बूम (माईक) घेऊन फिरत आहे. सेलिब्रेटींच्या लग्नात एखादा पत्रकार ज्याप्रमाणे इतरांच्या मुलाखती घेतो, त्याचप्रमाणे या महाशयांनी स्वतःच्या लग्नाचं रिपोर्टिंग केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सर्वात आधी त्याने वडिलांशी संवाद साधला आणि मुलाच्या लग्नात कसं वाटतंय, असा प्रश्न विचारला. आई, सासू, सासरे अशा सगळ्यांच्या त्याने मुलाखती घेतल्या. तो यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या होणाऱ्या बेगमलाही प्रश्न विचारले. 'कसं वाटतंय?' या प्रश्नावर 'मी खुश आहे' असं त्रोटक उत्तर देताच त्याने बायकोला आणखी चार प्रश्न विचारत बोलतं केलं.
'मी तुझ्यासाठी महागड्या गाड्या घेऊन येपतोय, स्पोर्ट्स कार आणल्या, वरातीकडे अख्खं जग पाहत राहील, याची व्यवस्था केली, आणि तू साधं माझ्याकडेही पाहत नाहीस' असं म्हणते पत्रकाराने तिला छेडलं. त्यावर माझी पहिली इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद, आयुष्यभर तू माझ्या इच्छा पुरवशील, अशी खात्री आहे, अशी मनोकामना तिने व्यक्त केली.
यापूर्वी पाकिस्तानच्या चांद नवाब या रिपोर्टरचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. त्यानंतर त्याच प्रकारचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू खुलेल, एवढं नक्की.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement