सहा वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी आले 20 हजार बाईक रायडर्स, कारण जाणून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हजारो बाईक रायडर्स रस्त्यावर एकत्र बाईक चालवताना दिसत आहेत.
![सहा वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी आले 20 हजार बाईक रायडर्स, कारण जाणून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी Viral video 15 to 20k bike raiders come to show 6 year old cancer patient support in germany सहा वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी आले 20 हजार बाईक रायडर्स, कारण जाणून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/21/9458e313adc1a263605abf21b002c161_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हजारो बाईक रायडर्स रस्त्यावर एकत्र बाईक चालवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहून तुम्हाला ही कदाचित एखाद्या निवडणुकीची ही रॅली वाटेल. पण रिपोर्ट्सनुसार ही एक व्हायरल बातमी आहे जी यूट्यूबपासून इंस्टाग्रामपर्यंत खूप लोकप्रिय झाली आहे.
कॅन्सरग्रस्त मुलासाठी 15-20 हजार लोक आले
गेल्या वर्षी जर्मनीतील र्हाऊरडफेनमधल्या (Rhauderfehn) एका सहा वर्षांच्या मुलाला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तो शेवटच्या टप्प्यात होता आणि जगणे अशक्य झाले होते. मुलाला बाईक आणि त्यांचा आवाज ऐकण्याची खूप आवड होती. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या पालकांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यांना वाटले 15-20 लोक नक्की येतील, पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलाला भेटण्यासाठी 15-20 नाही तर तब्बल 15-20 हजार लोक त्यांच्या बाईकवरून आले होते.
हा पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
सर्व बाईक रायडर्सनी मुलाला त्याच्या समोरून गाडी चालवताना सलामी दिली. या व्हिडीओमध्ये मुलाचा आनंद तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. त्या मुलाला सॅल्यूट करत, त्याच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद मनात साठवत हे 15-20 हजार बाईक रायडर्स त्याच्या जवळून पुढे गेले.
खरंतर आपल्या छोट्याशा कृतीमुळे एखाद्याला किती मोठा आनंद आपण देऊ शकतो त्याचं हे एक उदाहरण आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Queen Elizabeth Covid Positive: ब्रिटेनच्या महाराणी एलिजाबेथ-II यांना कोरोनाची लागण
- Russia-Ukraine conflict : गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे, भारतीय दूतावासाकडून परिपत्रक जारी
- Red Heart Emoji : रेड हार्ट पाठवाल तर मिळेल मोठी शिक्षा, 'या' देशानं बनवला कायदा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)