Ukraine Conflict : रशियासोबतच्या तणावाचा भारताच्या संबंधांवर परिणाम नाही - अमेरिका
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात सीमा तणावाचा प्रश्न आहे, अमेरिका दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने आहे.
Ukraine Conflict: काही दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UN Security Council) रशिया-युक्रेनच्या (russia-ukarine) तणावावर विचार मंथन केले जात आहे. यामध्ये भारताच्या (India) संबधांवर कितपत परिणाम होणार, यावर अमेरिकेच्या (united states of america) परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ''यूएनमध्ये काय भूमिका घ्यायची हा सर्वस्वी भारताचा निर्णय आहे. आम्ही भारत, चीनसह (china) जगातील अनेक देशांशी संपर्कात आहोत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमक कारवाईचा बहुतांश देशावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट केले.
चीनच्या 'त्या' वृत्तीबद्दल अमेरिकेकडून चिंता व्यक्त
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात सीमा तणावाचा प्रश्न आहे, अमेरिका दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने आहे. त्याच वेळी, चीनच्या वृत्तीबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. तसेच हितसंबंध म्हणून इंडो-पॅसिफिक भागातील देशांसोबत अमेरिका सदैव असेल. विशेष म्हणजे, यूएस स्टेट डिपार्टमेंट व्यतिरिक्त, इतर वरिष्ठ अमेरिकन खासदारांनी 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या पीएलए सैनिकांची निवड ही बीजिंग ऑलिम्पिक सिझनसाठी मशालधारक म्हणून नियुक्ती करणे हे अत्यंत 'लज्जास्पद' असल्याचे म्हटले.
"अमेरिका भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा देत राहील"
यूएस सिनेटच्या परराष्ट्र समितीचे सदस्य रिपब्लिकन सिनेटर जिम रिश म्हणाले की, अमेरिका भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा देत राहील. जिम यांनी ट्विट केले की, " भारतावर हल्ला करणाऱ्या आणि उइगर मुस्लिमांची कत्तल करणाऱ्या लष्करी सैन्याला बीजिंग ऑलिम्पिक २०२२ चे मशाल वाहक म्हणून निवड करण्यात येणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. अमेरिका उइगरच्या स्वातंत्र्याला आणि भारताच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा देत राहील.
बीजिंग ऑलिम्पिकवर भारताचा बहिष्कार
नवी दिल्लीत भारताने घोषित केले की, बीजिंगमधील भारतीय दूतावासाचे प्रमुख बीजींगच्या 2022 ऑलिंपिकच्या उद्घाटन किंवा समारोप समारंभात सहभागी होणार नाहीत. कारण चीनने भारतातील गलवान खोऱ्यातील संघर्षात सहभागी असलेल्या लष्करी कमांडरला पुरस्कार दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनचे हे पाऊल खेदजनक असल्याचे म्हटले आहे.