(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Robert Durst : अमेरिकन अब्जाधीश रॉबर्ट डर्स्टला मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली आजीवन कारावासाची शिक्षा
रॉबर्ट डर्स्टच्या (Robert Durst) गायब झालेल्या पत्नीबद्दल सुसान बर्मन याने पोलिसांना काही माहिती दिल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे 2000 साली रॉबर्ट डर्स्टने त्याच्या या मित्राची हत्या केली.
Robert Durst : अमेरिकेतील रिअल इस्टेट क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती आणि अब्जाधीश रॉबर्ट डर्स्टला (Robert Durst) त्याच्या खास मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात त्याला पॅरोल मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच. रॉबर्ट डर्स्टच्या गायब झालेल्या पत्नीबद्दल त्याचा मित्र असलेल्या सुसान बर्मन याने पोलिसांना काही माहिती दिल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे 2000 साली रॉबर्ट डर्स्टने त्याच्या मित्राची हत्या केली होती.
रॉबर्ट डर्स्टने (78) जवळपास दोन दशकामागे त्याचा खास मित्र असलेल्या सुसान बर्मनची बेवर्ली हिल्स या ठिकाणी त्याच्या राहत्या घराच्या मागे गोळी घालून हत्या केली होती. पण आतापर्यंत रॉबर्ट डर्स्टने सातत्याने त्याच्यावरचा हा आरोप फेटाळला आहे.
न्यायमूर्ती मार्क विंडहॅम यांनी रॉबर्ट डर्स्टला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावताना सांगितलं की, "रॉबर्ट डर्स्टने त्याच्या पत्नीच्या गायब होण्याच्या प्रकरणातील साक्षीदाराची हत्या केली आहे. त्या संबंधी उपलब्ध असलेले सर्व पुरावे हे आरोपीला शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत."
US property tycoon Robert Durst sentenced to life in prison for killing his best friend.
— AFP News Agency (@AFP) October 15, 2021
Durst was found guilty for killing Susan Berman in 2000 to keep her from talking to police about the disappearance of his wife two decades earlierhttps://t.co/dR6ImgbGwZ pic.twitter.com/sajWixN5oM
जवळपास दोन दशकांपूर्वी रॉबर्ट डर्स्टची पत्नी गायब झाली होती. त्यासंबंधी न्यूयॉर्क पोलिसांनी चौकशी सुरु केली. सुसान बर्मन हा रॉबर्ट डर्स्टचा खास मित्र आणि त्याचा प्रवक्ता होता. न्यूयॉर्क पोलिसांशी त्याने संपर्क साधल्याचं आणि त्यांना माहिती दिल्याचा संशय रॉबर्ट डर्स्टला होता. त्यामुळे रॉबर्ट डर्स्टने सुसान बर्मनची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय. रॉबर्ट डर्स्टला त्याच्या पत्नीच्या गायब होण्याच्या प्रकरणात कधीही आरोपी करण्यात आलं नव्हतं.
रॉबर्ट डर्स्ट हे अमेरिकेतील मोठं नाव आहे. एचबीओने त्याच्या जीवनावर आधारित 'द जिंक्स: द लाईफ अॅन्ड डेथ्स ऑफ रॉबर्ट डर्स्ट' (The Jinx: The Life and Deaths of Robert Durst) या नावाने एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. महत्वाचं म्हणजे 2015 साली या डॉक्युमेन्टरीचा शेवटचा भाग प्रसारित होण्याआधी काही तासापूर्वीच अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या :