एक्स्प्लोर

Biggest lottery : अमेरिकेतील व्यक्तीने जिंकली $2.04 अब्जाची जॅकपॉट लॉटरी, आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस

Biggest lottery : कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने इतिहासातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकले आहे

Biggest lottery : मंगळवारी यूएस लॉटरीच्या (US Lottery) अधिकृत वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकले आहे, त्याच्या तिकीटाचा क्रमांक विजयी क्रमांकाशी जुळला आहे. 

लॉटरीतील जॅकपॉट विजेत्याचा क्रमांक जाहीर

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका व्यक्तीने $2.04 बिलियन रुपयांची लॉटरी जिंकली आहे. पॉवरबॉल जॅकपॉटचे हे तिकीट अल्ताडेना येथे विकले गेले. पॉवरबॉल डॉट कॉम वेबसाइटवर निकाल पोस्ट करण्यात आला. त्यानुसार मंगळवारी सकाळी लॉटरीतील जॅकपॉट विजेत्याचा क्रमांक जाहीर करण्यात आला. या तिकिटाचा क्रमांक 1033414756 आहे. याशिवाय, 11.2 दशलक्षाहून अधिक तिकिटांना रोख बक्षिसेही मिळाली आहेत. लोकांनी लॉटरीद्वारे एकूण 98.1 दशलक्ष बक्षिसे जिंकली आहेत. पहिला जॅकपॉट 1.9 अब्ज निश्चित करण्यात आला होता. नंतर याची रक्कम वाढून ती 2.04 अब्ज झाली. हे तिकीट विकणाऱ्या जोसेफ चायडला1 मिलियन डॉलर कमिशन म्हणून मिळाले आहेत.

जॅकपॉट विजेत्याने अद्याप बक्षीसावर दावा केलेला नाही

कॅलिफोर्निया लॉटरीच्या प्रवक्त्या कॅरोलिन बेकरच्या मते, जॅकपॉट विजेत्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने अद्याप आपल्या बक्षीसावर दावा केलेला नाही. तिकीट विक्रेते चायड यांनी मीडियाला सांगितले की, तो 1980 मध्ये सीरियातून अमेरिकेत आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. त्याने सांगितले की कॅलिफोर्निया लॉटरी अधिकाऱ्यांनी फोनवर सांगितले की तुमच्या विकलेल्या तिकिटावर कोणीतरी $2 अब्जचा जॅकपॉट जिंकला आहे. त्यानंतर त्यांना आयोगाबाबत सांगण्यात आले. जोसेफ चायडच्या म्हणण्यानुसार, त्याने यापूर्वी कधीही इतकी रक्कम पाहिली नव्हती. याद्वारे तो अनेकांची स्वप्ने पूर्ण करू शकणार आहे.

भाग्यवान व्यक्ती कधी समोर येईल? 
यापूर्वी या सर्वाधिक बक्षीस रकमेची सोडत सोमवारी रात्री काढण्यात येणार होती, मात्र त्यानंतर काही कारणांमुळे सोडत काढण्यात आली नाही. त्यामागे तांत्रिक कारणे देण्यात आली. आता 2 अब्ज डॉलर्सचा जॅकपॉट मिळवणारा भाग्यवान व्यक्ती कधी समोर येईल? याची सर्वांना प्रतीक्षा आहे. अमेरिकन मीडियाही त्या व्यक्तीची वाट पाहत आहे. जॅकपॉट विजेत्याला बक्षिसाची रक्कम स्वतः किंवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधीद्वारे देखील मिळू शकते.

जॅकपॉटची रक्कम वाढतेय

2016 मध्ये 3 ऑगस्ट पासून पेनसिल्व्हेनियामध्ये भव्य पारितोषिक जिंकल्यापासून याच्या जॅकपॉटची रक्कम वाढत आहे. फ्लोरिडा लॉटरी स्टुडिओमध्ये जॅकपॉट जिंकल्यापासूनचे 40वे पॉवरबॉल जॅकपॉट आहे. मागील पॉवरबॉल रेकॉर्ड जॅकपॉट 2016 मध्ये होता. जेव्हा कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि टेनेसीमधील तिकिट धारकाने $1.586 अब्जचा जॅकपॉट जिंकला होता. पॉवरबॉल आयोजकांच्या मते, जॅकपॉट जिंकण्याची शक्यता 292.2 दशलक्ष लोकांपैकी केवळ एकाची आहे. या ड्रॉइंगमध्ये फक्त तिकीटधारकांनाच पैसे मिळत नाहीत. यूएस कर अधिकारी सुमारे 40 टक्के जॅकपॉटमधील रक्कम घेतात, तसेच राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांनाही याचा वाटा मिळतो. कोणताही एकमेव पॉवरबॉल विजेता एक-वेळ पेआउट निवडू शकतो. 

45 यूएस राज्यांमध्ये तिकिटांची खरेदी 

पॉवरबॉल तिकिटांची खरेदी 45 यूएस राज्यांमध्ये केली जाते. ही खरेदी करण्यासाठी $2 खर्च येतो, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, पोर्तो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलंडमध्ये तिकीट विकले जातात. पॉवरबॉल खेळण्यासाठी, तिकीट खरेदीदाराने 1 ते 69 मधील पाच भिन्न संख्या, नंतर 1 ते 26 पर्यंत पॉवरबॉल क्रमांक निवडणे आवश्यक आहे. मग खरेदीदार घरे, नवीन कार, फॅन्सी फूड आणि लक्झरी सुट्ट्यांचे स्वप्न पाहतो आणि त्यानंतरच्या संभाव्य मंदीची वाट पाहत मोठी स्वप्ने पाहतो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget