एक्स्प्लोर

Monkeypox : मंकीपॉक्सचा वाढता धोका, अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर, भारतातील परिस्थिती काय? जाणून घ्या...

Monkeypox in US : मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता 90 दिवसांसाठी आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतासह जगभरातील मंकीपॉक्सची परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या.

Monkeypox in US : जगभरात मंकीपॉक्सचा (Monkeypox Virus) वाढता प्रार्दुभाव पाहायला मिळत आहे. भारतासह अमेरिकेतही (America) मंकीपॉक्सचा धोका वाढताना दिसत आहे. अमेरिकेत (US) मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आरोग्य आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये गुरुवारी 6 हजार 600 मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासन हाय अलर्टवर असून योग्य उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेने गुरुवारी मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. या घोषणेमुळे या मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी फेडरल निधी आणि संसाधनांचा वापर करण्यात मदत होईल. AFP वृत्तसंस्थेनुसार, आरोग्य सचिव जेवियर बेसेरा यांनी सांगितलं आहे की, 'आम्ही मंकीपॉक्स विषाणूचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आम्ही अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मंकीपॉक्स गांभीर्याने घेण्यास आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन करतो. यासाठी प्रशासन योग्य ती मदत करेल.'

अमेरिकेमध्ये गुरुवारी 6 हजार 600 मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कमध्ये एक चतुर्थांश रुग्णांची नोंद झाली आहे. आणखी रुग्णांनी नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आरोग्य आणीबाणी 90 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा सर्वाधिक उद्रेक न्यूयॉर्ख आणि सॅनफ्रिन्सिस्कोमध्ये झाल्याचं आढळलं आहे. 

भारतात नऊ जणांना मंकीपॉक्सची लागण

देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत,  तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  

मंकीपॉक्सवर लवकरच येणार लस

सीरम इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे की, 'लवकरच मंकीपॉक्स लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणं बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल.' 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget