US Midterm Elections : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नबीला सय्यद यांनी रचला इतिहास, 23 व्या वर्षी जिंकली निवडणूक
US Midterm Elections : अमेरिकेमध्ये पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशांच्या 23 वर्षीय नबीला सय्यद यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे.
US Midterm Elections : अमेरिकेत ( America ) नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय-अमेरिकन वंशाच्या ( Indian American Women ) नबिला सय्यद ( Nabeela Syed ) यांनी इलिनॉय विधानसभेची निवडणूक ( Illinois General Assembly Elections ) जिंकून इतिहास रचला आहे. ही निवडणूक जिंकणाऱ्या त्या विधानसभेच्या सर्वात तरुण महिला सदस्य ठरल्या आहेत. नबिला सय्यद अवघ्या 23 वर्षांची आहे. नबिला यांनी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिस्पर्धी ख्रिस बोस यांचा पराभव केला आहे. इलिनॉयच्या निवडणुकीत नबिला यांना 52.3 टक्के मते मिळाली आहेत.
भारतीय वंशाच्या नबीला सय्यद यांनी रचला इतिहास
अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीमध्ये दोन्ही सभागृहांचे सदस्य म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ( Lower House Member ) आणि सिनेट सदस्य ( Upper House Member / ) आणि राज्यांचे राज्यपाल निवडले जातात. यावेळी मध्यावधी निवडणुकांमध्ये नबिला सय्यद यांनी इतिहास रचला आहे. त्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाच्या महिला सदस्य ठरल्या आहेत. नबिला सय्यद या अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह असलेल्या युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या सदस्य बनल्या आहे. अमेरिकन संसदेला युनायटेड स्टेट्स काँग्रेस ( United States Congress ) म्हणतात.
My name is Nabeela Syed. I’m a 23-year old Muslim, Indian-American woman. We just flipped a Republican-held suburban district.
— Nabeela Syed (@NabeelaforIL) November 9, 2022
And in January, I’ll be the youngest member of the Illinois General Assembly.
नबिला यांनी घरोघरी जाऊन केला प्रचार
अमेरिकन संसदेचं कनिष्ट सभागृह काँग्रेसमध्ये ( US House of Representatives ) नबिला सय्यद या सर्वात कमी वयाच्या सदस्य ठरल्या आहेत. या विजयावर प्रतिक्रिया देताना नबिला यांनी म्हटलं आहे की, जेव्हा मी ही निवडणूक लढण्याची घोषणा केली होती, तेव्हा माझा एकच उद्देश होता, तो म्हणजे जनतेशी संवाद साधत जनतेच्या मूळ अडचणी आणि त्रास जाणून घेणं. लोकांनी या लोकशाहीच्या कामामध्ये पुढे यावं अशी माझी इच्छा होती.' नबिला यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता.
23 व्या वर्षी निवडणूक जिंकत सर्वात तरुण महिला खासदार
निवडणुकीतील विजयाचा आनंद नबिला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट शेअर करत नबिला सय्यद यांनी ट्विट केलं आहे की, 'माझं नाव नबिला सय्यद आहे. मी 23 वर्षांची मुस्लिम भारतीय-अमेरिकन महिला आहे. मी नुकतीच रिपब्लिकन-आयोजित शहरी संस्था निवडणूक जिंकली आहे. जानेवारीमध्ये मी इलिनॉय विधानसभेची ( Illinois General Assembly ) सर्वात तरुण सदस्य होईन.'
अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात भारतीयांचं वर्चस्व
अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये भारतीयांचं वर्चस्व आहे. अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात नबिला सय्यद यांच्यासह अनेक भारतीयांनी विजय मिळवला आहे. अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांनी पुन्हा एकदा सदस्य होण्याचा मान मिळवला आहे.