एक्स्प्लोर

Donald Trump US Iran War: एकीकडे चर्चा, दुसरीकडे धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉम्बचा फोटो शेअर केला; एका वाक्य लिहित म्हणाले...

Donald Trump US Iran War: एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात कराराबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे आज सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

Donald Trump US Iran War: इराण-अमेरिका कराराबाबत (US Iran War) अनिश्चितता कायम आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर एआय-निर्मित (AI-generated) फोटो शेअर करून इराणला धमकी दिली आहे, ज्यामध्ये एका लढाऊ विमानाच्या खालच्या बाजूला बॉम्ब लावलेला दिसत आहे. या फोटोसोबत, या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद....असंही लिहिलेलं आहे. 

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात कराराबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे आज सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबत किंवा इराण-अमेरिका कराराबाबत  डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतीही घोषणा झालेली नाही. (Donald Trump US Iran War)

मी वाईट करार करत नाही- डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump US Iran War)

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये लिहिले होते, जर मी इराणसोबत करार केला, तर तो चांगला असेल, ओबामांच्या करारासारखा नाही, ज्याने इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली आणि अणुशस्त्र विकासाचे दरवाजे उघडले. आमचा करार याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, पण तो कोणीही पाहिलेला नाही आणि तो काय आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यावर अजून पूर्णपणे वाटाघाटीही झालेल्या नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ज्या गोष्टीबद्दल त्यांना काहीच माहिती नाही, त्यावर टीका करणाऱ्या त्या नालायकांचे ऐकू नका. माझ्या आधीच्या लोकांप्रमाणे, ज्यांनी ही समस्या अनेक वर्षांपूर्वीच सोडवायला हवी होती, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच मी वाईट करार करत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

अमेरिका-इराण कराराला कशामुळे अडथळा का येतोय? (US Iran War)

इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, या कथित करारामध्ये सर्व आघाड्यांवरील युद्ध संपवण्याचा एक आराखडा समाविष्ट होता, ज्यानुसार वाटाघाटींदरम्यान अमेरिका इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करणार होती. अल जझीराने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, अमेरिका करारातील दोन प्रमुख मुद्द्यांवरून माघार घेत असल्याचे संकेत देत आहे. इराणी मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया आणि लेबनॉनमधील युद्धविराम. होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणचा अणुकार्यक्रम हे देखील वादाचे प्रमुख मुद्दे असल्याचे दिसते.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु होणार? (Strait of Hormuz)

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमेरिका, इराण आणि त्या भागातील काही देशांसोबत लकवरकच एक करार होईल असं म्हटलं.  या करारामध्येच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्याचा समावेश असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले सुरु केल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत अमेरिकेची कोंडी केली होती. होर्मुझमधून विनापरवाना जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget