Turkey Earthquake: भूकंपाच्या लागोपाठ दुसऱ्या धक्क्याने तुर्कीत हाहाकार... 1300 हून जास्त लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त
Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियाला लागोपाठ दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं असून त्यामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे.
Turkey Syria Earthquake: तुर्की आणि सीरियाला या दशकातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं असून त्यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1.24 मिनीटांनी दुसरा धक्का बसला असून यामध्ये तुर्की आणि सीरियातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. लागोपाठ झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे सहा हजार लोक जखमी झाले आहेत.
झोपेतच मृत्यूनं गाठलं
तुर्कीमध्ये लागोपाठ झालेल्या या भूकंपात आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे झोपेतच या लोकांना मृत्यूनं गाठलं. तुर्कीत पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने प्रमुख शहरांतील अनेक भाग नष्ट केले. तर सीरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. सीरियामध्ये आतापर्यंत 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तुर्कीमध्ये आतापर्यंत 900 हून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुर्कीत झालेल्या या भूकंपाचं केंद्र हे गाझियानटेप असल्याचं स्पष्ट झालं आहे.
#BREAKING New 7.5-magnitude earthquake hits southeast Turkey: USGS pic.twitter.com/bo7PDLKOCX
— AFP News Agency (@AFP) February 6, 2023
भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या. अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
#UPDATE A 7.5-magnitude earthquake struck southeast Turkey Monday afternoon, the US Geological Survey said, hours after an earlier quake killed more than 1,200 people in the region.
— AFP News Agency (@AFP) February 6, 2023
The shallow quake hit at 1:24 pm (1024 GMT).
📸 Images from the damage of the earlier earthquake pic.twitter.com/D43XtI8HuL
भारताची मदत, NDRF च्या दोन टीम तुर्कीला जाणार
तुर्कीत लागोपाठ झालेल्या या दोन भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असून भारतानेही त्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. भारताकडून एनडीआरएफच्या दोन टीम तुर्कीमध्ये जाणार आहेत. त्यामध्ये एकून 100 जवांनांचा समावेश आहे. त्याशिवाय तुर्कीला भारताकडून औषधं, गोळ्या, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय मदत पाठवण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: