एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय तरुणाचा न्यूझीलंडमध्ये मृत्यू, कुटुंबाची स्वराज यांच्याकडे धाव
फहदचं पार्थिव भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे.
ऑकलंड : न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला. सय्यद अब्दुल रहीम फहदला एका 20 वर्षीय बेदरकार चालकाने आपल्या मर्सिडिजने कारने धडक दिली. सय्यद फहद हा मूळचा हैदराबादचा आहे.
आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. फहदचं पार्थिव भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे.
फहद पार्ट टाइम टॅक्सी ड्रायव्हर होता
- फहद हैदराबादच्या चंचलगुडाचा रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वीच तो ऑकलंडला गेला होता.
- ऑकलंडमध्ये शिक्षणासोबतच पार्ट टाईम टॅक्सीही चालवत होता. न्यूझीलंड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- रविवारी प्रवाशाला पिक करण्यासाठी तो ऑकलंडबाहेरच्या एका शहरात जात होता. यावेळी ट्रॅफिक सिग्नल तोडून एका मर्सिडिज कारने फहदच्या कारला समोरुन धडक दिली.
- फहदचा जागीच मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या फहदच्या एका नातेवाईकाने त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली.
ट्रॅफिक सिग्नल तोडून धडक दिली
- ही घटना रविवारची आहे. 29 वर्षीय फहद आपल्या कारने प्रवाशाला पिक करण्यासाठी जात होता. याचवेळी ट्रॅफिक सिग्नल तोडून एका बेदरकार मर्सिडिजने फहदच्या कारला जोरदार धडक दिली.
- या घटनेत फहदच्या कारचा पुढचा भाग पूर्णत: तुटला होता. तर ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या फहदचा जागीच मृत्यू झाला.
- पोलिसांनी पाठलाग करत मर्सिडिजच्या चालकाला अटक केली. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचं वय 20 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना
- न्यूझीलंडमधून फहदचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे.
शिवाय आर्थिकदृष्ट्याही मदत करावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. आम्ही न्यूझीलंडमधील भारतीय दूतावासाकडूनही मदत मागितल्याचं फहदचा भाऊ फैजलने सांगितलं.
- तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनीही सुषमा स्वराज यांना ट्वीट करुन फहदच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement