एक्स्प्लोर
‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान मोदी
व्हिर्जीनिया (अमेरिका) : ‘सर्जिकल स्ट्राईबद्दल एकाही देशाची भारताला प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. सर्जिकल स्ट्राईकमुळं जगाला देशाचं सामर्थ्य दिसलं’, असं वक्तव्य करत अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे. मोदींनी आज (सोमवार) अमेरिकेत भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी भारतातल्या विकासाचा पाढाही वाचला.
गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. असंही मोदींनी ठासून सांगितलं. व्हिर्जीनिया इथं मोदींनी भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
मोदी-ट्रम्प भेटीवर पाकिस्तानची नजर
दरम्यान, मोदी-ट्रम्प भेटीवर पाकिस्तानची विशेष नजर आहे. कारण भेटीआधीच ट्रम्प यांनी मोदींना खरा मित्र असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिका पाकिस्तानपासून दूर आहे. आता मोदी-ट्रम्प भेटीत पाकिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. स्वत: ट्रम्प दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतात.
वर्किंग डिनरचं आयोजन
व्हाईट हाऊसमध्ये आज मोदींच्या सन्मानार्थ ट्रम्प वर्किंग डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे.
दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याअमेरिका दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार असल्याचं कळतं.
संबंधित बातम्या:
व्हाईट हाऊसमध्ये आज मोदी-ट्रम्प भेट!
भारताच्या विकासात योगदान द्या, मोदींचं अमेरिकेतील 21 टॉप कंपन्यांना आवाहन
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास रचणार!
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement