एक्स्प्लोर
पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट, 26 जणांचा मृत्यू
दुपारी झालेल्या या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले आहेत.

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोर शहरातील अरफा करीम आयटी टॉवरजवळ स्फोट झाला. दुपारी झालेल्या या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाजवळ हा स्फोट झाला. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. स्फोटानंतर आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या कर्मचाऱ्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या स्फोटाचं लक्ष्य पोलीस होते. स्फोट झाला त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील अरफा करीम टॉवर बाहेर अधिकारी अतिक्रमण हटवण्यात व्यस्त होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















