(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोडला देश? सभापती म्हणाले...
Sri Lanka Political Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्याचे वृत्त सभापतींनी फेटाळून लावले आहे.
Sri Lanka Political Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्याचे वृत्त सभापतींनी फेटाळून लावले आहे. श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभय वर्धना यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, राष्ट्रपती गोटाबाया अजूनही देशातच आहेत. ते म्हणाले की, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्याचे मी चुकून म्हटले होते. ते देशात असून बुधवारी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही नवीन सरकार स्थापनेनंतर पद सोडणार असल्याचे सांगितले आहे.
President of Sri Lanka Gotabaya Rajapaksa is still in the country, I made a mistake in the (BBC) interview: Speaker of Sri Lanka’s Parliament Mahinda Yapa Abeywardena confirms to ANI in a telephone call
— ANI (@ANI) July 11, 2022
अंतरिम सरकार कधी स्थापन होणार?
राष्ट्रपती राजपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याचे मान्य केल्यानंतर रविवारी विरोधी पक्षांनी चर्चा केली. यात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन सर्वपक्षीय सरकार स्थापन होताच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी त्यांना सोपवणार असल्याचं मान्य केलं आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आज सांगितले की, चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मंत्र्यांचे असे मत होते की, सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा करार होताच ते त्या सरकारकडे आपली जबाबदारी सोपवण्यास तयार आहेत. सोमवारी कॅबिनेट मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी मंत्र्यांशी चर्चा केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल
श्रीलंकेवर आर्थिक संकट! मदत आणि समर्थनासाठी सनथ जयसूर्यानं मानले भारताचे आभार