Sri Lanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा, आता ठराविक प्रमाणातच इंधन खरेदी करता येणार
Sri Lanka Crisis : श्रीलंकेमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी लांबच लांब रांग लागल्या आहेत.
Sri Lanka Weekly Fuel Quota : श्रीलंकेमधील (Sri Lanka)आर्थिक संकट दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललं आहे. इंधनाचा (Fuel Shortage) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील महिन्यापासून पेट्रोल- डिझेलसाठी (Petrol and Diesel) साप्ताहिक इंधन कोटा (Weekly Quota) लागू केला जाईल. श्रीलंकेकडील परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात पुरेसं इंधन उपलब्ध नाही. त्यामुळे आता सरकार पेट्रोल आणि डिझेलचा साप्ताहिक कोटा ठरवण्याचा करण्याचा विचारात आहे. यानुसार आता नोंदणीकृत ग्राहकांना पेट्रोल पंपावरून ठराविक प्रमाणातच इंधन खरेदी करता येणार आहे. श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी रविवारी ट्विट करून याची घोषणा केली आहे.
'साप्ताहिक कोटा ठरवण्याशिवाय पर्याय नाही'
श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी सांगितलं आहे की, 'ग्राहकांना पेट्रोल पंपावर नोंदणी करून साप्ताहिक कोटा निश्चित करुण देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. इंधन पुरवठा सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना इंधन खरेदीसाठी मर्यादा घालण्यात येईल. ग्राहकांना आठवड्यात ठराविक प्रमाणातच इंधन खरेदी करता येईल. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही निर्णय लागू करण्यात येईल.
पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा
श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडील परकीय चलनाचा साठा संपल्याने श्रीलंकेला इतर देशांकडून इंधनाचा साठा मागवण्यातही यश मिळत नाहीय. पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध नसल्यामुळे श्रीलंकेतील लोकांना इंधन घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर लांबच लां रांगा लावाव्या लागत आहेत.
इंधनाच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात 10 तास वीज कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार इंधनाची 'रेशनिंग' यंत्रणा राबवण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या