एक्स्प्लोर

पाकिस्तानमध्ये रात्री 10 नंतर लग्न करण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण

pakistan power crisis : पाकिस्तानातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी घातली आहे.

Pakistan Power Crisis : पाकिस्तानातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी घातली आहे. बुधवारपासून या बंदीची अंमलबजावणी होणार आहे. यासोबतच लग्नात पाहुण्यांना एकच डिश सर्व्ह करण्याची परवानगी दिल्याची बातमी आहे. या नवीन निर्बंधाबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

विजेची मागणी वाढली

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या एक महिन्यापासून हा देश या समस्येला तोंड देत आहे. जागतिक इंधनाच्या किमतीत झालेली वाढ, स्थानिक चलनाच्या किमतीत झालेली घसरण आणि उन्हाळ्यात विक्रमी वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमधील विजेची मागणी वाढली आहे.

निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना

सरकारने पोलीस आणि प्रशासनाला या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे पाकिस्तनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कार्यालयांमध्ये शनिवारची साप्ताहिक सुट्टी बहाल करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही घोषणा केली.

तत्पूर्वी पंतप्रधान शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली वीज बचतीबाबत बैठक झाली. या बैठकीत ऊर्जा विभागाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि वायूच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे विजेच्या टंचाईला तोंड देण्यासाठी ऊर्जा संवर्धन योजना सादर केली. वित्त विभागानेही एक योजना सादर केली. बैठकीत मंत्रिमंडळाने पुन्हा शनिवार हा सुट्टीचा दिवस जाहीर करण्यास मान्यता दिली, मात्र ऊर्जा वाचवण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत बाजार बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

कर्मचाऱ्यांच्या इंधन कोट्यात कपात

यासोबतच मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या इंधन कोट्यात 40 टक्के कपात करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी आणि ऊर्जा बचतीबाबत जनजागृती मोहीम राबवण्यासाठी सरकारी बैठका ऑनलाइन घेण्याचेही प्रस्ताव देण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळे ऊर्जा वापर दहा टक्क्यांनी कमी व्हावा, असा पाकिस्तानी सरकारचा प्रयत्न आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 
हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Embed widget