एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहशतवादी भावाचा खात्मा, आफ्रिदीचं काश्मीर कनेक्शन!
सातत्याने अशी विधानं करण्यामागे आफ्रिदीचं काश्मीर कनेक्शन आहे.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावर केलेल्या विधानानंतर भारतीयांनी त्याच्यावर चहुबाजूंनी टीका केली आहे. अनेक खेळाडूंनीही यावर पलटवार केला आहे. मात्र काश्मीरबाबत वादग्रस्त विधान करण्याची शाहिद आफ्रिदीची ही पहिलीच वेळ नाही. सातत्याने अशी विधानं करण्यामागे आफ्रिदीचं काश्मीर कनेक्शन आहे.
आफ्रिदीच्या दहशतवादी भावाचा खात्मा
शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ शाकिब हा दहशतवादी होता. काश्मीरच्या अनंतनाग परिसरात 7 सप्टेंबर 2003 रोजी भारतीय सैन्यासोबतच्या चकमकीत त्याचा खात्मा झाला होता. बीएसएफने कंठस्नान घालण्याआधी शाकिब दोन वर्ष काश्मीरमध्ये दहशत पसरवत होता. शाकिब पाकिस्तानातील पेशावरमधला होता.
तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि आपली ‘हरकत-उल-अन्सार’ ही दहशतवादी संघटना मजबूत करण्यासाठी शाकिब शाहिद आफ्रिदीच्या नावाचाही वापर करत असे. तो आफ्रिदीसोबतचं नातंही सगळ्यांना सांगत असे. नंतर या संघटनेचं नाव ‘लष्कर-ए-तोयबा’ झालं.
तर दुसरीकडे शाकिबच्या मृत्यूबाबत विचारलं असता शाहिद म्हणाला होता की, “माझं कुटुंब फार मोठं आहे. कोण चुलत भाऊ आहे आणि कोण काय करतो हे मला माहित नाही.”
आणखी एक कनेक्शन
भारत, पाकिस्तान आणि काश्मीरसोबत शाहिद अफ्रिदीचा स्वातंत्र्यकाळापासूनचा संबंध आहे. 1947 मध्ये काश्मीर पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यासाठी पाक सैन्याने आफ्रिदी आदिवासींचा वापर केला होता.
1947 मध्ये भारताची फाळणी झाली त्यावेळी राजा हरि सिंह यांच्या जम्मू काश्मीर संस्थानने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. भारताने काश्मीरवर आपला हक्क सांगितल्यानंतर पाकिस्तानने आफ्रिदी आदिवासांनी काश्मीरमध्ये पाठवलं.
आफ्रिदी आदिवासींसोबत वझीर, महसूद, तुरी, मोहमंद आणि मलाकंद युसुफझई आदिवासींनी काश्मीरवर ताबा मिळवला. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मेजर जनरल अकबर खान यांनी ह्याचं नेतृत्त्व केलं होतं. संपत्ती आणि स्त्रियांसाठी आफ्रिदींना काश्मीरवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केलं. ट्रकभरुन सशस्त्र आफ्रिदी काश्मीरमध्ये आले. पण महिलांवर बलात्कार करण्यात आणि संपत्ती लुटण्यात त्यांना अधिक रस होता.
आफ्रिदींकडून सुरु असलेली हिंसा आणि लूट थांबवण्यासाठी राजा हरि सिंह यांनी भारताकडे मदत मागितली होती. यानंतर भारताने पाकिस्तानी समर्थक आफ्रिदी आदिवासींविरोधात सैन्य पाठवलं. ऑक्टोबर 1947 सुरु झालेला हा संघर्ष 1 जानेवारी 1949 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या शांती करारानंतर संपला. यानंतरच जम्मू काश्मीरचा दोन तृतीयांश भाग भारताच्या ताब्यात आला तर एक तृतीयांश भागावर आजही पाकिस्तानचा ताबा आहे.
या लढाईत सहा हजारांपेक्षा जास्त आफ्रिदी आदिवासींचा मृत्यू झाला होता. कदाचित त्या पराभवाची सल आजही आफ्रिदी आदिवासींमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे शाहिदी आफ्रिदीही काश्मीवर कायम भाष्य करत असतो.
ट्वीटवर वाद
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. मात्र आफ्रिदीने जम्मू काश्मीर मारलेल्या या 13 दहशतवाद्यांबाबत आपुलकी व्यक्त केली होती. “भारतव्याप्त काश्मीरची परिस्थिती चिंताजनक आहे. तिथे स्वातंत्र्याचा आवाज दाबला जात आहे. पण हे पाहून मला आश्चर्य वाटतंय की, संयुक्त राष्ट्र कुठे आहे? अशा कारवाई रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र कारवाई का करत नाही?,” असं ट्वीट त्याने केलं होतं.
भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंकडून समाचार
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला होता. “आफ्रिदीबद्दल बोलण्यासारखं काय आहे? आफ्रिदी ज्या यूएनबद्दल बोलतोय, त्याचा अर्थही त्याला माहित नाही. यूएन त्याच्यासाठी अंडर 19 क्रिकेट आहे, ज्याच्या पलिकडे त्याला काहीच माहित नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,'' असा टोला गंभीरने लगावला आहे.
आफ्रिदीच्या ट्वीटला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही उत्तर दिलं. देशाविरोधी वक्तव्य करणाऱ्यांचं कधीही समर्थन करणार नाही. माझ्यासाठी देशाचं हित सर्वात मोठं असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली आहे.
तर दुसरीकडे माजी कर्णधार कपिल देव यांनीही शाहिदला चांगलेच खडसावलं आहे. “शाहिद आफ्रिदीने आधी आपली पातळी ओळखावी, असं कपिल देव यांनी म्हटलं. “तसंच, त्याला इतकी महत्त्व देण्याची काहीही गरज नाही,” असा सल्लाही त्यांनी भारतीय माध्यमांना दिला आहे.
तर सुरेश रैनानेही शाहिद आफ्रिदीला सुनावलं. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही देवभूमी आहे. याच भूमीत माझ्या पूर्वजांचा जन्म झाला. त्यामुळे या भूमीत रक्तपात थांबवण्यासाठी शाहिद आफ्रिदींनी आधी आपल्या सैन्याला आणि प्रशासनाला सांगावं. कारण, आम्हाल शांतता हवी आहे.”
तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शाहिद आफ्रिदीला खडे बोल सुनावले. "देश चालवण्यासाठी सक्षम लोक आहेत. देश कसा चालवायचा हे कोणी आम्हाला शिकवू नये."
आफ्रिदीचं स्पष्टीकरण
या टीकेनंतर शाहिद आफ्रिदीने नवं ट्वीट करुन, आपल्या ‘त्या’ ट्वीटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाही तर त्याने स्पष्टीकरणाच्या ट्वीटमध्ये भारतीय तिरंग्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे.
आफ्रिदीने म्हटलंय की, “आम्ही सर्वांचा सन्मान करतो. हा फोटो खऱ्या खेळाडूचं उदाहरण आहे. मात्र जेव्हा मानवाधिकाराचा मुद्दा येतो, तेव्हा तो आमच्या निरागस काश्मीरींनाही लागू व्हावा”
संबंधित बातम्या
आफ्रिदीला फार सीरियस घेऊ नका : गंभीर
आधी गंभीर म्हणाला सीरियस घेऊ नका, आता आफ्रिदी म्हणतो...
शाहिद आफ्रिदीचा भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंकडून समाचार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement