एक्स्प्लोर
Advertisement
सौदीमधून 4 महिन्यात 39 हजार पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी
रियाध: गेल्या चार महिन्यात तब्बल 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना सौदी अरबियाने पाकिस्तानात परत पाठवलं आहे. त्यांना पाकिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सौदी सरकारनं त्यांच्यावर व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. यासंदर्भात सौदी सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
सौदी सरकारने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या चार महिन्यांपासून सौदीमधील वास्तव्य आणि तिथे काम करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवलं. हा अहवाल देशातील संरक्षण यंत्रणांमधील विविध पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पाकिस्तानी नागरिक आयसिस या दहशतवादी संघटनेशी काम करत असल्याने, सौदी सरकारसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरली होती. याशिवाय काही पाकिस्तानी नागरिकांना अंमली पदार्थ तस्करी, चोरी, फसवणूक, आणि मारामारीसारख्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शूरा काऊन्सिलच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष अब्दुला अल-सादो यांनी पाकिस्तानी नागरिकांना कामावर ठेवण्याआधी त्यांची योग्य ती तपासणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
याशिवाय, अब्दुला यांनी सर्व विभागांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहुन, सौदीमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवण्याच्ये आदेश दिले आहेत. याबरोबरच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा राजकीय आणि धार्मिक कल कोणत्या बाजूने आहे, हेही जाणून घेणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या नागरिकाला सौदी अरेबियात प्रवेश दिला जाऊ नये, असे स्पष्ट अब्दुला यांनी दिले आहेत.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सात मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली होती. याचे पडसाद सध्या अमेरिकेतील उद्योग क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयाला माहिती तंत्राज्ञान क्षेत्रातील गूगल, फेसबुक, ट्विटर, अॅपलसह 97 नामांकित आयटी कंपन्यांनी आव्हान दिलंय. तर अमेेरिकेतल्या दुसऱ्या एका कोर्टानं ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
संबंधित बातम्या
...तर ट्रम्प सरकारने पाकिस्तानकडून बक्कळ दंड वसूल करावा!
ट्रम्प यांच्या निर्णयाला गूगल, फेसबुकसह 97 कंपन्यांचं कोर्टात आव्हान
ट्रम्प यांच्या मुस्लिमांना देशबंदीच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती
मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प
ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर फेसबुक, गुगल, अॅपलचं टीकास्त्र
डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?
इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये ‘नो एंट्री’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement