एक्स्प्लोर

Indian Medical Students : युक्रेन सोडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियाची ऑफर, शिक्षण पूर्ण करण्याची संधी

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीयांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या विद्यार्थ्यांना रशिया शिक्षण पूर्ण करण्याची संधी देत आहे.

Russia On Indian Medical Students : युक्रेन ( Ukraine ) आणि रशिया ( Russia ) या दोन देशांमध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष ( Russia Ukraine War ) थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी रशियाने ऑफर दिली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

युद्घामुळे मायदेशी परतले आहेत भारतीय विद्यार्थी

दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना रशियाकडून ऑफर

रशियन कॉन्सुल जनरल ओलेग अवदीव चेन्नईमध्ये आले. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण सुरू पूर्ण करु शकतात कारण दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच,  भारतीय विद्यार्थ्यांना रशियामधील लोकांची भाषा समजणं देखील सोपं जाईल कारण युक्रेनमधील मोठ्या संख्येने लोक रशियन भाषिक आहेत.

रशियामध्ये पूर्ण करता येणार शिक्षण

ओलेग अवदेव यांनी पुढे सांगितलं की, अनेक लोक शिक्षणासाठी रशियामध्ये जातात. रशियामध्ये अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षण आणि विविध अभ्यासक्रमासाठी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये जातात. युद्धामुळे, विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी युक्रेनमध्ये परतू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेण्याची संधी आहे.

भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये का जातात?

दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जाणं पसंत करतात. भारतात प्रायव्हेट कॉलेजमधून मेडिकल शिक्षण घेण्यासठी सुमारे 80 लाख रुपये खर्च करावे लागतात, त्याऐवजी युक्रेनमध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात.

युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यावर 90 फ्लाईट्समधून 22 हजार 500 भारतीयांना युक्रेनमधून सुखरुप भारतात आणण्यात आलं. यामध्ये बहुतेक हे भारतीय विद्यार्थी होते, जे युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते. हे विद्यार्थी सुमारे आठ महिन्यांपासून आपल्या शिक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashish Shelar : ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
TCS  Manager Manav Sharma : TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025Special Report Bus Depo Reality Check : एसटी डेपोंची 'रिअ‍ॅलिटी', 'माझाचा' चेकSpecial Report Prashant Koratkar | इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कुठे?Special Report Swarget Case :स्वारगेटच्या नराधमाचं राजकीय कनेक्शन,आजी-माजी आमदारांचे आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashish Shelar : ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
TCS  Manager Manav Sharma : TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Stock Market Crash : स्टॉक मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला, निफ्टी 50 आपटला, गुंतवणूकदार सैरभैर
शेअर मार्केटमध्ये ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स कोसळला, निफ्टी गडगडला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Earthquake : अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
Embed widget