Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण
Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत.
Ukraine Russia War : रशिया युक्रेनच्या युद्धाला आता अकरा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटाला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेलं युद्ध अजुनही सुरु आहे. खरंतर रशियासारख्या बालढ्य देशासमोर युक्रेनचा पाडाव होईल, असा अंदाज अनेकांनी बाधला. पण, तसं झालं नाही. युक्रेनने रशियाला जशासतसं उत्तर दिलं आणि अजूनही युक्रेन प्रतिकार करत आहे. हे सगळं सुरु असतानाच युक्रेनच्या राजधानीत एक हेलिकॉप्टर कोसळलं आणि युद्धाची आग आणखी भडकली.
युद्धाच्या झळा सोसणाऱ्या युक्रेनची राजधानी किव्हमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं. सर्वात महत्वाचं म्हणजे ते हेलिकॉप्टर एका शाळेजवळ कोसळलं. त्याच दुर्घटनेत युक्रेनचे गृहमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह 18 जणांचा मृत्यू झाला. सोबतच दोन शाळकरी मुलांचाही मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तातडीने त्याचा तपास सुरु झाला. घटनेच्या वेळी परिसरात दाट धुके होते तर शहरात बर्फवृष्टीही झाली होती. अशा खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा अंदाज काही जणांनी लावले. तर हा अपघात नसून घातपात आहे. रशियाने हल्ला केल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर आण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. युक्रेनच्या दोन शहरांमध्ये सैन्य पाठवले होते. गेल्या अकरा महिन्यांपासून सुरु असलेलं युद्ध अजूनही संपलेलं नाही.
हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे युद्धाची आग आणखी भडकणार?
रशियाला युक्रेनकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे. जिथे रशियाने ताबा मिळवला होता अशा अनेक शहरांमध्ये युक्रेनने पुन्हा वर्चस्व मिळवलं आहे. अशातच हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ही दुर्घटनेमुळे युद्धाची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.
युक्रेनने 12 वसाहतींवर ताबा मिळवला
युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने 11 नोव्हेंबर रोजी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, खेरसन शहरातील 12 वसाहती रशियन सैन्याच्या ताब्यातून सोडवण्यात आल्या आहेत. युक्रेनियन सैन्याने पुन्हा ताबा मिळवलेल्या भागांत डुडचानी, पाइतिख्त्की, बोरोझेंस्के, सदोक, बेझवोदने, इश्चेन्का, कोस्ट्रोम्का, क्रॅस्नोल्युबेत्स्क, कालिनिवस्के, बॉब्रोव्ही कुट, बेझिमेने आणि ब्लागोडात्ने यांचा समावेश आहे. तसेच युक्रेनच्या जनरल स्टाफने रशियन सैन्याचं Ka-52 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.