Russia Ukraine Crisis : प्रवास करताना गाडीवर भारताचा झेंडा लावा, यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी
Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.
Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे.
यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये जे विद्यार्थी सीमा भागाजवळ राहतात त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, कॅश (अमेरीकी डाॅलर) आणि इतर गरजू वस्तू सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच प्रवास करण्यासाठी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावावा अशा भारतीयांना प्रमुख सूचना दिला आहे. तसेच कोरोनाच्या लसीकरणाचं प्रमाणपत्र देखील बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
युक्रेनमध्ये भारतातील तब्बल 18 हजार भारतीय अडकले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.तेथील परिस्थिती अधिकच चिघळल्यामुळे भारतीयांना एयरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. युद्धमुळे हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे भारतीयांना आणण्यासाठी इतर मार्गाचा विचार केला जात आहे. विदेश राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले आहे.
रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान युक्रेनमध्ये गेले होतं. मात्र, युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आलंय. त्यामुळे विमान माघारी परतले.
संबंधित बातम्या :