(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन यांच्यात आज पुन्हा चर्चा; तोडगा निघणार?
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि युक्रेनही हार मानायला तयार नाही.
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि युक्रेनही हार मानायला तयार नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली असली, तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. आज पुन्हा दोन्ही देशांमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धावर होणारी चर्चा सोमवारी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) व्हिडीओ लिंकद्वारे सुरू होईल. युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या हवाल्यानं स्पुतनिकनं हे वृत्त दिलं आहे.
युक्रेनवरील रशियन हल्ले म्हणजे, शीतयुद्धाचं सावट
रशियाशी शत्रुत्व, अण्वस्त्रांची शर्यत अशी काहीशी परिस्थिती सध्या रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धा दरम्यान पाहायला मिळत आहे. यावरुन अमेरिकन लोकांच्या पिढ्यांना काही जुने दिवस आठवत आहेत. युक्रेनवरील हल्ल्याचा अमेरिकेचा कट्टर शत्रू रशियाबरोबर शीतयुद्धाचं सावट दिसू लागलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये पुन्हा एकदा वैचारिक लढाई पाहायला मिळत आहे. आम्ही लोकशाहीचे रक्षण करू, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं आहे.
अमेरिकेसाठी, रशियानं चित्रपट किंवा टेलिव्हिजनमधील खलनायकी व्यक्तिरेखा कधीही टाळली नाही. आता तो पुन्हा क्रेमलिनशी तणावात आहे, ज्याची संपूर्ण भू-राजकीय पटकथा तयार आहे. आता पुन्हा पूर्व आणि पश्चिम यांच्यात शत्रुत्वाचे वारे वाहू लागले आहेत. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधील इतिहास आणि आंतरराष्ट्रीयवादाचे प्राध्यापक आणि वुड्रो विल्सन सेंटरच्या शीतयुद्ध आंतरराष्ट्रीय इतिहास प्रकल्पाचे संचालक जेम्स हर्शबर्ग म्हणाले, "हे शीतयुद्धाचं सावट आहे."
त्यांचं म्हणणं आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आक्रमक वृत्ती सोव्हिएत युनियनसाठी कम्युनिझम सारख्या वैचारिक आधारावर आधारित होती तशी नाही. मात्र, सध्याच्या संकटात दोन अण्वस्त्र महासत्ता एकमेकांसमोर आहेत आणि रशियाचा सामरिक अतिरेक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी विनाशकारी परिस्थिती निर्माण करत आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :