Russia Ukraine War: युक्रेनचा थेट रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला, जशास तसं उत्तर देण्याचा रशियाचा इशारा
Russia Ukraine News : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची हत्या करण्याचा प्रयत्न युक्रेनने केला असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामध्ये (Russia Ukraine War) मोठी अपडेट आली असून युक्रेनने थेट रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला केल्याची माहिती आहे. रशियाने दोन्ही ड्रोन निकामी केले असून युक्रेनचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे. मात्र थेट पुतिन यांच्यावर केलेल्या या हल्ल्यामुळे रशियाने संताप व्यक्त केला असून युक्रेनला जशास तस उत्तर देणार असल्याचं सांगितलं.
WATCH | यूक्रेन की पुतिन पर हमले की साजिश नाकाम@RubikaLiyaquat के साथ | https://t.co/p8nVQWYM7F#Russia #Ukraine #RussiaUkraineWAR #WAR pic.twitter.com/dLbrkK7Ot2
— ABP News (@ABPNews) May 3, 2023
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना दहशतवाद्यांप्रमाणे मारण्यासाठी युक्रेनने ड्रोन पाठवले, असा आरोप रशियन सरकारकडून करण्यात आला आहे. याची युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशाराही रशियाने दिला आहे.
रशियाचे 'पॉवर हाऊस' समजल्या जाणाऱ्या क्रेमलिनने बुधवार, 3 मे रोजीच्या एका निवेदनात म्हटले आहे, "युक्रेनने आज ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचे कृत्य म्हणजे दहशतवादी हल्ला आहे. आम्हाला स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. रशिया त्याला जशास तसं उत्तर देईल.
Russia Ukraine War : रशियन सैन्याने युक्रेनचे दोन ड्रोन पाडले
क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने युक्रेनने सोडलेले दोन ड्रोन पाडले आहेत. हे ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश युक्रेनला घातक शस्त्रे पुरवत असल्याचा रशियन सरकारचा आरोप आहे. युक्रेनला आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या छोट्या-मोठ्या शस्त्रास्त्रांची रसद मिळाली आहे. त्याच्याकडे अत्याधुनिक ड्रोनचा ताफाही असल्याचे सांगण्यात येत आहे.
The dome of the Kremlin was set on fire to celebrate Russia's Defeat Day@KremlinRussia_E@mod_russia#Moscow #Russia#Kyiv #Ukraine 🇺🇦#Kherson #Bakhmut pic.twitter.com/QORymzCZ34
— RakanSlmaan (@RakanSlmaan) May 3, 2023
20,000 हून अधिक रशियन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान 20,000 हून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि 80,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
ही बातमी वाचा:























