(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War : नाटो आणि रशियातील संघर्ष तिसरे महायुद्ध सुरू करेल : जो बायडन
Ukraine Russia War : नाटो आणि रशिया यांच्यातील थेट संघर्ष तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देऊ शकतो, असा इशारा देत हा संघर्ष थांबवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे.
Ukraine Russia War : "आम्ही रशिया आणि युक्रेन विरुद्ध युद्ध लढणार नाही. परंतु, अमेरिका नाटोच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यास तयार आहे. नाटो आणि रशिया यांच्यातील थेट संघर्ष तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देऊ शकतो, असा इशारा देत हा संघर्ष थांबवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. याबरोबरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे युक्रेनविरुद्धचे युद्ध आधीच अयशस्वी झाले आहे, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
रशियाचे व्यापारी संबंध कायमचे रद्द केल्यामुळे रशियाला युनायटेड स्टेट्सबरोबर व्यवसाय करणे कठीण होईल. रशियन व्होडका, सीफूड आणि हिरे यांच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी अमेरिका पावले उचलत आहे. या निर्णयामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनविरूद्धच्या आक्रमकतेसाठी अजून जबाबदार धरण्यात येईल". असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
Direct confrontation between NATO and Russia would trigger World War III: President Joe Biden
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2022
ही कारवाई करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसवर दबाव आणल्याबद्दल बायडन यांनी पेलोसीचे आभार मानले आहेत. पुतिन यांच्यावर निशाणा साधत बायडन म्हणाले की, पुतिन हे आक्रमक असून त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. अमेरिका युक्रेनियन निर्वासितांचे स्वागत करेल आणि युद्धग्रस्त राष्ट्राला अतिरिक्त मदत देण्यास अमेरिका वचनबद्ध आहे.
दरम्यान, रशियावरील निर्बंध सतत सुरूच राहतील, असे बायडन यांनी म्हटले आहे. याबरोबरच युक्रेनवरील अन्यायकारक हल्ल्यासाठी रशियाला भविष्यातही दोषी धरण्यात येईल. शिवाय या हल्ल्याची जागतिक स्तरावर रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे.
अमेरिकेप्रमाणे जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रशियन कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबरोबरच या निर्बंधांची रशियन खेळाडू आणि इतर लोकही किंमत मोजत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War : युक्रेनवरील हल्ल्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा इशारा
- Ukraine Russia War: पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटांचं संभाषण
- Ukraine-Russia War: पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिट झाली चर्चा, 'या' मुद्द्यांवर झालं बोलणं
-
Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही