Russia Ukraine Conflict: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी 18-60 वर्षे वयोगटातील नागरिकांना 1 वर्षासाठी सैन्यात सेवेसाठी बोलवले
Russia Ukraine Conflict: अनेक महिन्यांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता युद्धाकडे सरकताना दिसत आहे.
Russia Ukraine Conflict: अनेक महिन्यांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता युद्धाकडे सरकताना दिसत आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. तसेच रशियाने बुधवारी युक्रेनच्या सीमेवर लष्कराची तैनाती वाढवल्याचे वृत्त आहे. रशिया कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी रशिया समर्थित फुटीरतावाद्यांनी युक्रेनमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व धोके लक्षात घेता, आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी 18 ते 60 वर्षे वयोगटातील Reservists सैन्याला किमान 1 वर्ष सेवा देण्यासाठी बोलावले आहे.
काय आहे Reservists सैन्य?
तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की Reservists सैन्य म्हणजे नेमकं काय? वेगवेगळ्या देशांच्या नियमांनुसार याचे वेगवगेळे अर्थ काढले जाऊ शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, अनेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला सैन्यात भरती होण्याचा कायदा आहे. गरज लागल्यास या कायद्याचा वापर केला जातो. Reservists हे असे सैनिक आहेत जे सैन्यात नियमित सेवा देत नाहीत, पण गरज पडेल तेव्हा त्यांना बोलावले जाऊ शकते. युक्रेनमध्ये, ही श्रेणी 18 ते 60 वर्षे वयोगटातील ठेवण्यात आली आहे. युक्रेनने अशा लोकांना फक्त 1 वर्षासाठी परत बोलावले आहे.
फुटीरतावाद्यांनी केला हल्ला
रशिया युक्रेनमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या सतत येत असल्या तरी अधिकृतपणे त्याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, येत्या 24 तासांत रशियाचे सैन्य युक्रेनवर पूर्णपणे हल्ला करू शकतात, असा दावा ऑस्ट्रेलियाने केला आहे. या दाव्यानंतर युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी युक्रेनच्या लष्करावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: