Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू; एबीपी माझाचे मानले विशेष आभार
Russia Ukraine War : राजधानी कीव्हमधून सुद्धा मुलं निघाली आहेत. या मुलांचा सध्याचा प्रवास सुरू केला. या मुलाखतीत मुलांनी एक सुरात एबीपीचे आभार मानले आहे.
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या मुलांच्या संदर्भातल्या विविध बातम्या एबीपी माझाने दाखवल्या. एबीपी माझाच्या वृत्तानंतर भारतीय दूतावासाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. काल या मुलांकडे अन्नपदार्थ पोहचवण्यात आले. भारतीय दूतावासाने मुलांशी संपर्क साधला. या मुलांसाठी विद्यापीठातून बस गाड्या आज सकाळीच रवाना झाल्या आहेत. या प्रवासात एबीपी माझा त्यांच्या सोबत आहे. या मुलांनी एबीपी माझाचे आभार मानले आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अडकलेल्या मुलांना तिथे सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांमधून सीमेपर्यंत यायला सांगितले आहे. राजधानी कीव्हमधून सुद्धा मुलं निघाली आहेत. या मुलांचा सध्याचा प्रवास सुरू केला. या मुलाखतीत मुलांनी एक सुरात एबीपीचे आभार मानले आहे.
Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू; ABP माझाचे मानले आभार..@RahulAsks @abpmajhatv #IndianStudents #ukraine #kiev #russia #odessa #kyiv #ABPMajha #ABPMajha #मराठीबातम्या #MarathiNews #maharashtra pic.twitter.com/GfFUxTQ90u
— ABP माझा (@abpmajhatv) March 1, 2022
मुळची कोल्हापूरची असलेली शाकंभरी सध्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिचीही व्यथा अगदी हृदयद्रावक आहे. मोठ्या प्रयत्यांनंतर तिच्याशी संपर्क साधला. यावेळी तिने व्यक्त केलेल्या युक्रेनमधील सध्यास्थितीवर अंगावर काटा आणणारी आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास सर्वच भारतीय विद्यार्थ्यांची काहीशी अशीच अवस्था आहे. तर युक्रेनमधील भारतीय दूतावासचे प्रतिनिधीही पोहोचले नसल्याचा आरोप नागपूरमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला होता. a
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या अंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालंय. या विमानातून 182 भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मुंबई विमानतळावर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मायदेशी परतताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. तर आपल्या लेकरांना पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावरच तिरंगा फडकवला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : एकीकडे अणुयुद्धाची तयारी, दुसरीकडे युक्रेनशी चर्चा; अखेर पुतिन यांची योजना काय?
- Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?
- Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब?