Luna-25 Crash: रशियाचे लुना25 चंद्रावर लँडिंग व्हायच्या शेवटच्या क्षणी कसं क्रॅश झालं? वाचा नेमकं काय घडलं
Russia Luna-25 Crash: भारताच्या चांद्रमोहिमेसोबत रशिचाचेही चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी पाठवण्यात आलं होतं.
Luna 25 Crashed : रशियाच्या चांद्रमोहिमेला (Moon Mission) मोठा झटका बसला असून लुना-25 (Russia Luna-25) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी क्रॅश झाले. रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसने (Roscosmos) याची पुष्टी केली आहे. रशियाने जवळपास 50 वर्षांनंतर चंद्रावर जाण्यासाठी मोहीम सुरू केली पण ती अयशस्वी ठरली.
रशियाचं लुना-25 हे अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार होते, परंतु लँडिंगपूर्वीच ते क्रॅश झाले. रॉसकॉसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2:57 वाजता Luna-25 शी अचानक संपर्क तुटला. त्यामुळे त्याच्या लँडिंगबाबत शंका निर्माण झाली होती.
कक्षा नीट बदलता आली नाही
रशियन स्पेस एजन्सीने आपल्या प्राथमिक निष्कर्षात सांगितले की, लूना 25 आपली कक्षा बदलताना काही अडचण आली आणि त्याची स्थिती बदलली, यामुळे कक्षा योग्यरित्या बदलता आली नाही. त्यानंतर लुना-25 एका अनपेक्षित कक्षेत गेले होते आणि चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यामुळे क्रॅश झाले.
लुना-25 यान प्री-लँडिंगसाठी कक्षेत पाठवण्यासाठी थ्रस्ट जारी करण्यात आला. परंतु नंतर स्वयंचलित स्टेशनवर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि मिशन पुर्णत्वास येऊ शकलं नाही. रॉसकॉसमॉसनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. जूनमध्ये, रोसकॉसमॉसचे प्रमुख, युरी बोरिसोव्ह यांनी या मिशनला असलेले संभाव्य धोके सांगितले होते आणि या मिशनला अंदाजे 70 टक्के यश मिळण्याची शक्यता वर्तवली होती.
दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग होणार होते
रशियन मीडियानुसार, 11 ऑगस्ट रोजी लुना-25 लाँच करण्यात आले. 800 किलो वजनाचे Luna-25 हे वाहन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होते जिथे अद्याप कोणीही पोहोचलेले नाही. मातीचे नमुने गोळा करायचे, चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी शोधायचे हे काम या माध्यमातून करण्यात येणार होते.
चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार
दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचे लँडर मॉड्यूल (LM) यशस्वीरित्या कक्षेत थोडेसे खाली आणले गेले. आता 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे.
चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3 (LVM-3) यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-3 मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत. त्यामुळे सर्व काही नियोजित केल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
Russia's Luna-25 spacecraft has crashed into the moon, reports Germany's DW News citing space corporation Roskosmos pic.twitter.com/ZtxYkFHUp2
— ANI (@ANI) August 20, 2023
ही बातमी वाचा: