Rishi Sunak : सासऱ्यांना खुश करण्यासाठी किती नोकऱ्या बदलणार? ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची नवी जबाबदारी, सोशल मीडियावर भन्नाट रिअॅक्शन
Rishi Sunak New Job : ऋषी सुनक यांचे सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी युवकांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

Rishi Sunak News : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पंतप्रधानपद सोडल्यापासून ते फक्त राजकीय क्षेत्रातच नाही, तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत सक्रिय झाले आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीस त्यांनी जागतिक वित्तीय कंपनी गोल्डमॅन सॅक्स (Goldman Sachs) मध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम सुरु केले, तर आता त्यांनी पत्रकारितेची सुरुवात करून द संडे टाइम्स (The Sunday Times) साठी साप्ताहिक बिझनेस कॉलम लिहिण्यासही सुरुवात केली आहे.
Rishi Sunak New Job : सोशल मीडियावर ट्रोलिंग
ऋषी सुनक यांचे हे वेगवेगळे काम सोशल मीडिया यूजर्सच्या टीकेचा विषय बनले आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल करताना त्यांचे सासरे आणि इन्फोसिस (Infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा संदर्भ दिला. ऋषी सुनक हे सर्व काम आपल्या सासऱ्यांना खुश करण्यासाठी करत आहेत अशा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.
Narayana Murthy : आठवड्यातून 70 तास काम करा, नारायण मूर्तींचा सल्ला
नारायण मूर्तींनी याआधी एका चर्चेत म्हटले होते की भारताला जपान आणि चीनसारख्या देशांशी स्पर्धा टिकवायची असल्यास कामाचे तास वाढवावे लागेल. त्यांनी तर अशीही सूचना केली होती की तरुणांनी देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी आठवड्याला 70 तास काम करण्यास तयार राहावे. नारायण मूर्तींच्या या वक्तव्यावर मोठा वाद झाला होता आणि मूर्ती यांनाही सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल व्हावं लागलं होतं.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऋषी सुनक यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे जोक केले आहेत. काहींनी म्हटले की, पंतप्रधानपद सोडल्यावर सुनक विविध नोकऱ्या स्वीकारून आपल्या सासऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका पोस्टमध्ये म्हटले गेले आहे, 'एनआरएन (NRN) चा जावई असणं सोपं नाही, सरकारी नोकरी सोडल्यावर अनेक नोकऱ्या घेतोय फक्त सासऱ्यांना खुश ठेवण्यासाठी."
एका युजरने मजेशीरपणे टिप्पणी केली, 'कदाचित जावई हा आठवड्यातून 70 तास काम करेल याची तजवीज नारायण मूर्ती करत आहेत.' काहींनी तर म्हटले की, 'जर ऋषी सगळ्या नोकऱ्या हाती घेत राहिले तर ब्रिटनच्या नोकऱ्यांवर काय परिणाम होणार?' तर काही लोकांनी विनोदात म्हटलं की, 'या दराने तर ऋषी सुनक AI पेक्षा जास्त नोकऱ्या करणार.'
ही बातमी वाचा:
























