एक्स्प्लोर
VIDEO : पाकिस्तानचा नवा 'चांद नवाब', टबमध्ये बसून पुराचं रिपोर्टिंग
गमतीशीर व्हिडीओच्या माध्यमातून रिपोर्टरने सरकारच्या गलथान कारभारावर तिरकस भाष्य केल्याचं दिसत आहे.
कराची : रस्त्यावर साचलेल्या पाण्याकडे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानमध्ये रिपोर्टरने चक्क एका टबमध्ये बसून रिपोर्टिंग केलं. प्रशासनाला जागं करण्यासाठी रिपोर्टरने ही अनोखी शक्कल वापरली.
पाकिस्तानची राजधानी लाहोर शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरने चक्क एका टबमध्ये बसून रिपोर्टिंग केलं.
‘मी कोणत्याही स्विमिंग पूलमध्ये नाही तर लाहोरमध्ये पाणी साचलेल्या एका रस्त्यावर आहे. तुम्हीही असंच वॉटरपूलचा वापर करुन रस्त्यावर फिरा, कारण या रस्त्यावरचं पाणी काढण्यात आपलं प्रशासन अपयशी ठरलं आहे.’ असं व्हिडिओच्या सुरुवातीलाच वार्ताहर सांगतो.
या गमतीशीर व्हिडीओच्या माध्यमातून रिपोर्टरने सरकारच्या गलथान कारभारावर तिरकस भाष्य केल्याचं दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भविष्य
क्राईम
Advertisement