एक्स्प्लोर
Advertisement
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे.
दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश जाहीर केला आहे. शेजारी आखाती राष्ट्रांनी टाकलेल्या दोन महिन्यांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे. 33 देशातील नागरिकांना 180 दिवस (सहा महिने) तर उर्वरित 47 देशातील नागरिकांना 30 दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल. सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली आहे.
सौदी अरेबिया, इजिप्त, बहारेन आणि यूएईने 5 जून रोजी कतारवर बहिष्कार लादला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी या देशांनी वाहतुकीचे संबंध तोडले.
या निर्णयामुळे कतार अत्यंत मुक्त देश म्हणून गणला जाईल, असा विश्वास कतार टुरिझम ऑथरिटीचे प्रमुख पर्यटन विकास अधिकारी हसन अल इब्राहिम यांनी व्यक्त केला. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी कतारने हा निर्णय घेतला आहे. कतार 2022 मध्ये होणाऱ्या सॉकर वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement