Pulitzer Prize 2022 : कोण आहेत जोसेफ पुलित्झर? पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार त्यांच्या नावानं का दिला जातो?
पुलित्झर पुरस्कार हा नक्की कोणाला दिला जातो? आणि जोसेफ पुलित्झर (Joseph Pulitzer) कोण आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Pulitzer Prize 2022 : पत्रकारिता क्षेत्रातील सर्वेच्च मानला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराची (Pulitzer Prize) घोषणा झाली आहे. या वर्षीचा पुलित्झर पुरस्कारनं पत्रकार अदनान अबिदी, सना इदशाद मट्टू, अमित दवे आणि दानिश सिद्दीकी या भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुलित्झर पुरस्कार हा नक्की कोणाला दिला जातो? आणि जोसेफ पुलित्झर (Joseph Pulitzer) कोण आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
हंगेरियन वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांच्या नावावरून पुलित्झर हा पुरस्कार दिला जातो. जोसेफ यांनी त्यांच्या मृत्युपत्रात कोलंबिया विद्यापीठाला पत्रकारिता शाळा सुरू करण्यासाठी आणि पुरस्कार सोहळा सुरू करण्यासाठी पैसे दिले. या पुरस्कारासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी त्यांनी 250,000 डॉलर दिले होते. पत्रकारिता क्षेत्रामधील चार पुरस्कारांशिवाय नाटक क्षेत्रातील चार, शिक्षणातील एक, प्रवासी शिष्यवृत्तीचे चार पुरस्कार जोसेफ यांच्या नावानं दिले जातात. त्यांचे निधन 29 ऑक्टॉबर 1911 रोजी झाले. त्यानंतर 4 जून 1917 मध्ये पहिल्यांदा पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. या पुरस्काराला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाद्वारे दिला जाणारा प्रमुख पुरस्कार, असं मानलं जातं.
'या' भारतीयांनी पटकावला पुलित्झर पुरस्कार
पुलित्झर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय गोबिंद बिहारी लाल हे होते. ते स्वातंत्रासाठी लढणारे पत्रकार होते. लाला हरदयाल यांचे नातेवाईक आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांनी गदर पक्षात सामील होऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळींमध्ये भाग घेतला होता. गोबिंद बिहारी लाल यांना 1937 मध्ये पुलित्झर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हार्वर्ड विद्यापीठातील विज्ञानासंबंधित कव्हरेजसाठी विज्ञान लेखक म्हणून त्यांनी इतर चार जणांसह पुलित्झर पुरस्कारानं गौरवण्यात आले होते.
2000 मध्ये लेखिका झुंपा लाहिरी यांना त्यांच्या "इंटरप्रिटर्स ऑफ मॅलाडीस" या कथा संग्रहसाठी पुलित्झर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांना "इंटरप्रिटर्स ऑफ मॅलाडीस" साठी त्यांना 5,000 डॉलर्स देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 2003 साली भारतीय वंशाच्या पत्रकार-लेखिका गीता आनंद यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ मुखर्जी, विजय शेषाद्री यांना देखील या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
संबंधित बातम्या :