एक्स्प्लोर

PM Modi Invitation: लवकरच पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर? शाहबाज शरीफ यांचं 8 वर्षांनी निमंत्रण, पण का?

PM Modi Invitation: पाकिस्तानच्या निमंत्रणानंतर आता तणावपूर्ण संबंधांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार की, त्यांच्या जागी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या मंत्र्याला इस्लामाबादला पाठवणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे.

PM Modi Invitation: शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाकिस्तान (Pakistan) भेटीचं निमंत्रण धाडलं आहे. शाहबाज शरीफ यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या इतर नेत्यांसह पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं आहे. कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंट (CHG) च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आलं आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सीएचजीची बैठक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना पाकिस्तानकडून निमंत्रित करण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या निमंत्रणानंतर आता तणावपूर्ण संबंधांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार की, त्यांच्या जागी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या मंत्र्याला इस्लामाबादला पाठवणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, सध्या SCO चे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे.  

पंतप्रधान मोदी कझाकिस्तानला गेले नाहीत

CHG बैठक 'राज्य प्रमुखांच्या परिषदे'नंतर निर्णय घेणारी दुसरी सर्वात महत्त्वाची संस्था आहे, जी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सहसा राष्ट्राध्यक्षांच्या शिखर परिषदेत सहभागी होत असतात, परंतु या वर्षी जुलै महिन्यात संसदेच्या अधिवेशनादरम्यान तारखांच्या वादामुळे ते कझाकिस्तानला गेले नाहीत. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सीएचजीच्या बैठकीत जे नेते उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना अक्षरशः या बैठकीत सामील करून घ्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही SCO चे पूर्ण सदस्य आहेत. या संघटनेचं नेतृत्व चीन आणि रशिया करत आहे, त्यामुळे भारत याबाबत अत्यंत सावध आहे. या संघटनेत चीनचा प्रभाव वाढू नये, अशी भारताची इच्छा आहे, असं झाल्यास ते पाश्चिमात्य विरोधी संघटनेचं रूप घेऊ शकतं.

भारताकडून कोण जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष 

भारत आणि पाकिस्तानात बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे. तरिसुद्धा काही असे मुद्दे आहेत, जिथे भारत आणि पाकिस्तानंन एकत्र येऊन निर्णय घेतले आहेत. 2023 मध्ये भारतात झालेल्या एससीओच्या बैठकीत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी भारताच्या बाजूने सीएचजी बैठकीला कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP MajhaLalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखलLalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
Embed widget