एक्स्प्लोर
बिश्केक SCO संमेलन | दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांची आर्थिक नाकेबंदी करा, नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं
दहशतवादाचं समर्थन, प्रोत्साहम आणि वित्तपुरवठा देणाऱ्या देशांना जबाबदार धरणे आवश्यक आहे. एससीओ सदस्यांनी दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी पूर्ण शक्ती वापरली पाहिजे असल्याचेही मोदी म्हणाले.
बीश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना एससीओ परिषदेत दहशतवादावरुन चांगलंच फटकारले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना जबाबदार धरा अशी मागणी मोदींनी एससीओ परिषदेत दुसऱ्या दिवशी केली आहे.
दहशतवादामुळे दररोज निर्दोष नागरिकांचे जीव जातात. सर्वांनीचं या दहसतवादाविरोधात आवाज उठवण्याची मागणी केली आहे. मोदी ही मागणी करत असताना त्यांच्या समोर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही बसले होते. मोदी दहशतवादावर बोलत असताना मोदींनी समोर बसलेल्या इमरान खानला नाव न घेता पुन्हा एकदा इशारा दिला.
तसेचं दहशतवादाचं समर्थन, प्रोत्साहम आणि वित्तपुरवठा देणाऱ्या देशांना जबाबदार धरणे आवश्यक आहे. एससीओ सदस्यांनी दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी पूर्ण शक्ती वापरली पाहिजे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर एका परिषदेचं आयोजन केलं असल्याचेही मोदी म्हणाले.
दरम्यान बिश्केकमधील परिषदेत पहिल्या दिवसापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यातील दरी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी पहिल्याचं दिवशी बोलणं टाळलं.
डिनरच्या वेळी नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्या बाजूला बसणंही टाळलं. इम्रान खान यांच्यासोबत ना त्यांनी हस्तांदोलन केलं, ना कुठली चर्चा केली. इतकंच काय, मोदींनी इम्रान खान यांच्याकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही. मोदींनी पाकिस्तानला दिलेली वागणूक इम्रान खान कायम लक्षात ठेवतील, अशीच होती.
दरम्यान, एससीओ परिषदेआधी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान चीनने पाकिस्तानसोबतच्या चर्चेचा मुद्दा समोर ठेवला, मात्र सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचं मोदींनी ठणकावून सांगितलं.
एससीओ परिषद काय आहे?
एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात सहकार संघटन संमेलन. एससीओ ही राजकीय आणि सुरक्षा संघटना आहे. या संघटनेचं मुख्यालय चीनच्या बीजिंगमध्ये आहे. 2001 मध्ये ही संघटना निर्माण झाली.
चीन, रशिया, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान हे संघटनेचे सदस्य आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 पासून संघटनेचे सदस्य झाले आहेत. सदस्य देशांचे सैन्य, आर्थिक मदत, गुप्त माहितीची देवाणघेवाण, मध्य आशियातील दहशतवादाविरोधात मोहीम अशा मुद्द्यांवर चर्चा होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement