एक्स्प्लोर

एकटा मावळा रणात झुंजला...भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी समर्थकांविरोधात 'तो' एकटा उभा राहिला!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी जर्मनीच्या फ्रँकफर्टमध्ये रॅली काढून भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना प्रशांत वेंगुर्लेकर यांनी चोख उत्तर दिलं. पाकिस्तानी नागरिकांच्या रोषाला ते जुमानले नाहीत. त्यांनी आपला संयम सोडला नाही, जागा सोडली नाही की तिरंगा फडकावणंही सोडलं नाही.

फ्रँकफर्ट : काहीशे पाकिस्तानी समर्थकांची रॅली आणि त्यांना उत्तर देणारा एकमेव मराठमोळा मावळा. हे चित्र होतं जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातील. एवढ्या पाकिस्तानी नागरिकांसमोर ताठ मानेने, हिंमतीने उभा राहिलेल्या या मराठमोळ्या भारतीयाचं नाव आहे प्रशांत वेंगुर्लेकर. भारताच्या स्वातंत्र्यदिनी फ्रँकफर्टमध्ये रॅली काढून भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध घोषणाबाजी देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारताचा तिरंगा फडकावत प्रशांत वेंगुर्लेकर यांनी चोख उत्तर दिलं. यावेळी पाकिस्तानी नागरिकांच्या रोषाला ते जुमानले नाहीत. त्यांनी आपला संयम सोडला नाही, जागा सोडली नाही की तिरंगा फडकावणंही सोडलं नाही. एवढ्या मोठ्या रॅलीविरुद्ध केवळ एका भारतीयाला पाहून मोर्चेकरीही काही वेळ स्तब्ध झाले होते.

फ्रँकफर्टमध्ये नेमकं काय घडलं? 15 ऑगस्ट, भारताच्या स्वातंत्र्यदिनी काही पाकिस्तानी समर्थक जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये जमा होऊन भारत तसंच पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत होते. 'आझाद काश्मीर' आणि 'खलिस्तान'ला पाठिंबा देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानी नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याशिवाय खलिस्तान आणि पाकिस्तान समर्थनाच्या घोषणाही बॅकग्राऊंडला ऐकू येत आहेत.

यावेळी एवढ्या मोठ्या रॅलीविरोधात एकटा मराठमोळा भारतीय देशाच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. प्रशांत वेंगुर्लेकर यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून तो जबरदस्त शेअर होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "काही पाकिस्तानी नागरिक फ्रँकफर्कमध्ये रॅली काढून आपल्या महान देशाविरोधात आणि पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत होते. मी एकट्याने त्यांचा विरोध केला आणि पाकिस्तानी नागरिकांनी विरोध करुनही मी जागेवरुन हटलो नाही. जय हिंद." या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि काही मीडियाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं होतं.

प्रशांत वेंगुर्लेकर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि हिंमतीमुळे काही पाकिस्तानी नागरिक त्यांच्या अंगावर धावून आले, तरीही त्यांनी तिरंगा फडकावत घाबरत नसल्याचं सांगितलं.

अभिनेता रितेश देशमुखने प्रशांत वेंगुर्लेकर यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन 'प्रशांत तुझा अभिमान आहे, जय हिंद, असं कॅप्शनही दिलं. प्रशांत वेंगुर्लेकर यांच्या या ट्वीटला जवळपास 15 हजारांपेक्षा जास्त रिट्वीट आणि 39 हजार लाईक्स मिळाले आहेत. सगळ्यांनी प्रशांत वेंगुर्लेकर यांच्या दाखवलेल्या देशप्रेमाचा, मराठी बाण्याचं कौतुक केलं आहे.

प्रशांत वेंगुर्लेकर हे सिव्हिल इंजिनिअर असून ते सध्या जर्मनीत काम करतात.

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget