एक्स्प्लोर
'आज पढाने की जिद ना करो..', पाकिस्तानी विद्यार्थ्याचा शिक्षिकेसमोर ठेका
इस्लामाबाद : शाळा, कॉलेजमध्ये असताना शिक्षकाने आज शिकवू नये, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. मात्र हे बोलून दाखवण्याची कुणाची हिंमत होत नाही. पण पाकिस्तानच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला अशा शब्दात नकार दिला, ज्यामुळे शिक्षिकाही केवळ पाहत राहिल्या.
'आज जाने की जिद ना करो...' या गाण्याच्या तालावर विद्यार्थ्याने वर्गातच 'आज पढाने की जिद ना करो...' या गाण्यावर ठेका धरला. शिक्षिकेनेसुद्धा गाण्याचा आनंद घेत खुर्चीवर बसणं पसंत केलं.
ट्विटरवर एका विद्यार्थ्याकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'आज पढाने की जिद ना करो...यू हीं खुर्ची पर बैठी रहो...', या गाण्यावर विद्यार्थ्याने शिक्षिकेसह सर्वांचं मनोरंजन केलं. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement