एक्स्प्लोर
कॅमेरासमोर अँकर्सचं कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला सिटी 42 न्यूज चॅनलच्या स्टुडिओतील हा व्हिडिओ अनेक फेसबुक पेजवर शेअर झाला आहे.
इस्लामाबाद : दोन पाकिस्तानी टीव्ही अँकरचं स्टुडिओत झालेलं कडाक्याचं भांडण लीक झालं आहे. लाहोरमधील 'सिटी 42' न्यूज चॅनलमधील अँकरचं हे भांडण ऑन एअर गेलं नसलं तरी कॅमेरात रेकॉर्ड झालं. त्यानंतर बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झालं.
'मी हिच्यासोबत कसं बुलेटिन करु? ही म्हणते माझ्याशी बोलू नकोस' अशी महिला अँकरबाबतची तक्रार पुरुष अँकरने न्यूज प्रोड्युसरकडे केली. यावर, 'मी लहेजाबद्दल बोलत होते. माझ्याशी आदराने बोल' असं उत्तर महिला अँकरने चिडून दिलं.
'मी कशा पद्धतीने बोललो?' असा प्रतिप्रश्न त्याने केला. त्यावर ती हळू आवाजात 'जाहिल' (अडाणी) असं म्हणते. यामुळे भडकलेला अँकर 'जरा आदराने बोल. हे सगळं रेकॉर्ड होत आहे का? विचित्र आहे, हिचे नखरे संपतच नाहीत' असं म्हणतो.
या वाक्यानंतर हा व्हिडिओ संपतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेक फेसबुक पेजवर शेअर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement